'सीरम'मधील इमारतीचे 'फायर ऑडिट' करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar said fire audit will conduct of building in Serum
Deputy Chief Minister Ajit Pawar said fire audit will conduct of building in Serum

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमधील नव्या इमारतीला लागलेल्या आगीचे कारण कळू शकलेले नाही; मात्र, तिची कारणे जाणून इमारतीचे "फायर ऑडिट' करण्यात येईल. त्यानंतर अहवालानुसार पुढील कार्यवाही होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणूनही सुरक्षिततेची नियमावली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, याबाबीही तपासल्या जातील; त्यात काही त्रुटी असल्यास गरजेनुसार घटनेची चौकशी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आगीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी रात्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन, वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार चेतन तुपे यांच्यासह जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सीरम इन्स्टिट्यूटमधील अधिकारी उपस्थितीत होते. 

पवार म्हणाले, "इमारतीतील "वेल्डिंग'च्या कामामुळे आग लागल्याची चर्चा असली तरी; नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. त्यासाठीच निरनिराळ्या एजन्सीमार्फत शुक्रवारी सकाळपासून "फायर ऑटिड' होईल. त्याचवेळी जिल्हा प्रशासन इतरही माहिती गोळा करीत आहे. ज्यामुळे घटनेचे नेमके कारण कळू शकेल. त्यानंतरच आगीच्या कारणांनुसार चौकशीची प्रक्रिया करता येणार आहे. मात्र, आता त्यावर बोलणे योग्य नाही. या घटनेतील मृत व्यक्ती या ठेकेराकडील कंत्राटी कामगार आहेत. कोरोनाच्या लशीच्या निमित्ताने सीरम इन्स्टिट्यूटची जगभरात चर्चा असून, अशा काळात ही घटना घडल्याची बाब गंभीर आहे. '' 


ससून रूग्णालयाला भेट 
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी अजित पवार थेट ससून रुग्णालयात रात्री नऊच्या सुमारास पोचले. या वेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे आदी उपस्थित होते. 

..'ते' अखेरपर्यंत आगीशी झुंजत राहीले  
मुख्यमंत्री आज भेट देणार 
सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीच्या घटनेची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता "इस्टिट्यूट'ला भेट देणार आहेत. तोपर्यंत सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घटनेची प्राथमिक चौकशी करून, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com