नवले पूल ते वडगाव पुल दरम्यान अतिक्रमणे पुढाऱ्यांची; जीव जातोय सामान्य माणसांचा

विठ्ठल तांबे
Thursday, 14 January 2021

अपघातांची मालिका सुरू असलेल्या नवले पूल ते वडगाव पुला दरम्यान असलेल्या सेवारस्त्यावर अनेक धनदांडगे आणि आजी-माजी नगरसेवक,आमदारांचे नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले दिसत आहे .

धायरी - गेल्या काही दिवसांपासून सतत अपघातांची मालिका सुरू असलेल्या नवले पूल ते वडगाव पुला दरम्यान असलेल्या सेवारस्त्यावर अनेक धनदांडगे आणि आजी-माजी नगरसेवक,आमदारांचे नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले दिसत आहे . परिसरातील नागरिक व वाहनचालकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे, परंतु प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे.

पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?

सेवा रस्ते हे 12 मीटर रुंदीचे असणे गरजेचे आहे, प्रत्यक्षात मात्र ते बारा मीटर दिसून येत नाहीत.काही ठिकाणी आजुबाजुच्या जागा मालकांनी अतिक्रमण करून काही व्यवसाय सुरू केलेले दिसत आहेत. यात हॉटेल ,फर्निचर दुकाने ,मार्बल दुकाने तसेच वाहनांचे अनधिकृत पार्किंग सुरू आहे .यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली पहावयास मिळते. तसेच अनेक हॉटेल व्यवसायकांनी सेवारस्त्यांवर अनधिकृत पार्किंगची व्यवस्था केलेली दिसत आहे.

पुणे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी जाहीर केली पोलिसांसाठी अभिनव योजना​

मागील काही दिवसांपासून अनेक अपघात या परिसरात घडले आहेत.यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.अपघात घडल्यानंतर तेवढ्यापुरते अधिकारी, पदाधिकारी, मंत्री यांचे या भागात दौरे होतात मात्र मुलभूत प्रश्न कित्येक वर्षांपासून तसेच आहेत.किमान आतातरी या अतिक्रमणांबाबत योग्य कारवाई प्रशासन करेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

"माझा डेव्हलपमेंट प्लॅन हा क्रेडिट रिझर्वेशन बॉण्ड द्वारे प्लॅन करून द्यावा मी माझी जागा उद्या देण्यास तयार आहे.मी शेतकरी असून डेव्हलपमेंट प्लॅन करण्यासाठी लागणारे चार-पाच कोटी खर्च करू शकणार नाही."
विकास दांगट, माजी नगरसेवक

लॉकडाऊन इफेक्ट! पुण्याच्या पोरींनी वाढवलं घरच्यांच टेन्शन; पैंजण विकून 'मुंबई'ची भटकंती

"महानगरपालिकेने जागा मालकांना(आर्थिक, टीडीआर, एफ एस आय)या स्वरूपात मोबदला दयावा,तसेच जगामलकांना देखील शक्य तेवढ्या लवकर जागा ताब्यात दिल्या पाहिजेत.तसेच अनेक हॉटेल व्यवसायकांनी सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग तयार केले आहे. तेही अपघात आणि वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत आहेत."
हरिश्चंद्र दांगट, माजी नगरसेवक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment between Navale Bridge to Wadgaon Bridge