पुणे जिल्ह्यातील इंदापूर, हवेलीतील परीक्षा शुल्क माफ; उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश

Money
Money

पुणे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीच्या यादीत इंदापूर, हवेली तालुक्‍यांचा समावेश झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३२५ तालुक्‍यांना याचा लाभ झाला होता. मात्र त्या यादीत २४ तालुक्‍यांची नावे नव्हती. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुधारित जाहीर केलेल्या यादीत पुणे जिल्ह्यातील इंदापूरसह पुणे शहराचा व हवेली तालुक्‍याचा समावेश केला आहे. 

गेल्या वर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या ‘क्‍यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडाले होते. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वादळांचा फटाका बसलेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्‍यांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचाही निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र शुल्क माफीच्या आदेशात त्रुटी असल्याने २४ तालुक्‍यांतील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे समोर आले. 

याबाबत सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार याबाबत कार्यवाही करून या तालुक्‍यांचाही यात समावेश करण्यात आला. याचा आदेश गुरुवारी (ता. २६) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे काढला आहे. 

शासनाने २४ तालुके वगळल्याने परीक्षा शुल्कमाफीच्या लाभापासून हजारो विद्यार्थी वंचित होते. मात्र, आता या विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी शुल्क भरलेले आहे, ते परत देण्याची कार्यवाही शासनाने लवकर सुरू करावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- अमर एकाड, अध्यक्ष, सुराज्य विद्यार्थी संघटना

मी गेल्या वर्षी दोन्ही सत्रांचे मिळून १ हजार ३६० रुपये शुल्क भरले आहे. शासनाने परीक्षा शुल्क माफ केल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.
- ऋतुजा कदम, विद्यार्थिनी, भिगवण

या २४ तालुक्‍यांतील विद्यार्थ्यांना लाभ

  • पुणे - इंदापूर, हवेली 
  • सोलापूर - करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा 
  • नंदुरबार - तलोदा, अक्कलकुआ
  • बीड - पटोदा, शिरूर (कसार), धारूर 
  • वर्धा - करंजा, अष्टी
  • नागपूर - नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी, मौदा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, भिवापूर, कुही

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com