भोसरी : गॅस गळतीकडे दुर्लक्ष केल्याने झाला 'तो' स्फोट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मंगळवारी (ता. ३) रात्री गॅस सिलेंडर बदललल्यानंतर सिद्धेशने गॅसचा उग्र वास येत असल्याची कल्पना दिली. मात्र नवीन सिलेंडर बदलल्यामुळे वास येत असल्याच्या समजूतीने मनिषा यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्रभर लिक होत असलेला गॅस घराचे दार-खिडक्या बंद असल्याने घरात साचून राहिला. मनिषा या भोसरीतील श्रमजीवी शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून काम करतात.

भोसरी : येथील संत तुकारामनगरातील गुरुकृपा कॅालनीत बुधवारी (ता. ४) झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात आई, वडील व मुलगा जखमी झाले होते. त्यापैकी मुलाला उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, आई ऐंशी टक्के भाजल्याने गंभीर आहे. तर वडीलांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, रात्री झोपताना मुलाने गॅसचा उग्र वास येत असल्याचे सांगितले असतानाही घरच्यांनी दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ घडल्याची चर्चा परिसरात होती.

विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार 

भोसरीतील संत तुकारामनगरातील गुरुकृपा कॅालनीमध्ये झालेल्या गॅसच्या स्फोटात मनिषा पांडुरंग साळुंके (वय ३५),  ज्ञानेश्वर पांडुरंग साळुंके (वय ४०),  सिद्धेश ज्ञानेश्वर साळुंके ( वय १३) जखमी झाले आहे. मनिषा साळुंखे या अद्यापही गंभीर आहेत.

पिंपरी : फुगेवाडी दुर्घटनेतील जवानांना आज 'डिस्चार्ज' 
मंगळवारी (ता. ३) रात्री गॅस सिलेंडर बदललल्यानंतर सिद्धेशने गॅसचा उग्र वास येत असल्याची कल्पना दिली. मात्र नवीन सिलेंडर बदलल्यामुळे वास येत असल्याच्या समजूतीने मनिषा यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्रभर लिक होत असलेला गॅस घराचे दार-खिडक्या बंद असल्याने घरात साचून राहिला. मनिषा या भोसरीतील श्रमजीवी शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून काम करतात. सकाळची शाळा असल्याने त्यांनी पहाटे उठून गॅस सिलेंडर सुरू केला. त्यावेळी घरात साचलेल्या गॅसने पेट घेऊन कानठळ्या बसविणारा आवाज होऊन स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की खिडकीच्या काचा फुटून सुमारे ऐंशी फुटावर उडाल्या. त्याचप्रमाणे घराचा दरवाजाचे तुकडे झाले. बाथरुमच्या दरवाजासह खिडकीही तुटली. शेजाऱ्यांच्या घरांच्या दरवाज्यासह खिडक्याही निखळून पडल्या. यामध्ये मनिषा यांच्यासह ज्ञानेश्वर आणि सिद्धेशच्याही अंगाने पेट घेतला. या अपघातात मनिषा या गंभीर जखमी झाल्या.

पुणे : सफरचंदापेक्षा कांदा महाग; किलोला तब्बल एवढा भाव  
             
नशीब बलवत्तर म्हणून...
साळुंके यांच्या घराजवळच विजयश्री मरडे आणि रिता सामल राहतात. घटनेच्या वेळी मरडे या किचनमधून स्नानगहात गेल्यानंतर पाचच सेकंदामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. तर रिता या याचवेळी बेडरूममधून किचनमध्ये गेल्या होत्या. या स्फोटात मरडे यांच्या किचनची खिडकी उडाली तर रिता यांच्या बेडरुमचीही खिडकी वेगाने उडून भिंतीवर आदळली. तर खिडकीच्या काचा फुटून अक्षरशा भिंतीमध्ये घुसल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणापासून काही क्षण अगोदर दूर गेल्यामुळेच जीव वाचल्याचे विजयश्री आणि रिता सांगतात.  

पुणे : सणसरजवळ युवकाचा खून

रेग्युलेटर तिरपा बसल्याने दुर्घटना ?
साळुंके यांच्या घरात नवीन आलेल्या गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर नजरचुकीने तिरका बसविल्याने गॅस गळती झाली. त्याचप्रमाणे घरात जमा झालेल्या गॅसकडे लक्ष न दिल्याने आणि गॅस शेगडी सुरू केल्याने हा अपघात झाल्याची माहिती गुजर गॅस एजन्सीचे व्यवस्थापक गणेश संभेराव यांनी दिली.

  #Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

बघ्यांची फक्त गर्दी...
बुधवारी पहाटे साडेसहा वाजता घटना घडल्यानंतर तेथेच राहत असलेल्या माझ्या भाच्याने मला घटनेची माहिती दिली. घटनास्थळापासून मी जवळच राहत असल्याने काही मिनिटातच घटनास्थळी पोचलो. मात्र घटनेला दहा पंधरा मिनिटे होऊनही शेजाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे काही शेजाऱ्यांकडे चारचाकी वाहने असतानाही तिचा वापर करण्याची तसदी कोणी घेतली नाही. शेवटी माझा मित्र संतोष सवई यांच्या चार चाकीतून जखमींनी दवाखान्यात नेले.
 - संतोष शेलार, अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र  

वो भी दिन थे... जेव्हा वडापावच्या गाडीवर कांदा मिळायचा  

घरात फक्त धूराचे साम्राज्य...
काणठळ्या बसणाऱ्या आवाजासह मोठा स्फोट झाला. खडबडून जागे झाल्यावर घरात फक्त धुराचे साम्राज्य दिसले. काहीच सूचत नव्हते. हळूहळू धूर नाहीसा झाल्यावर घरातील सर्व नातेवाईक सुखरुप असल्याचे पाहिल्यावर जिवात जीव आला. मात्र खिडकी, घराचे दोन्ही मुख्य दरवाजे, बाथरुमचे दरवाजे निखळून पडल्याचे दिसले. तर फ्रीज काहीसा चेंबलेला दिसला तर टिव्हीलाही क्रॅक आल्याचे दिसले. घरातील मांडणी अस्ताव्यस्त झालेली तर घरात सर्व ठिकाणी काचांचा सडा पडलेला होता.
- बालाजी मरडे, साळुंके यांचे शेजारी

हॉटेल, वडापावच्या गाड्या, खानावळीतील ताटातून कांदा गायब


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explosion Caused due to Gas leakage at Bhosari