पुणे : शिवापूरजवळ ओढ्याला पूर अनेक जण गेले वाहून; तिघांचे मृतदेह हाती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सकाळी आठ वाजेपर्यंत तीन मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरीक आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे.

खेड-शिवापूर : बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा फटका खेड-शिवापूर गावाला बसला आहे. येथील ओढ्याला आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेल्याची भिती नागरीक व्यक्त करत आहेत. तर फक्त तीन मृतदेह आत्तापर्यंत हाती लागल्याचे पोलिस सांगत आहेत. 

पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी 

बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे खेड-शिवापूर येथील दर्ग्याजवळील ओढ्याला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठा पुर आला. या पुरात दर्ग्याशेजारील दुकाने, घरे, वाहने वाहून गेली. तर अनेक जण पुरात वाहून गेल्याचे नागरीक सांगत आहेत. हा आकडा नेमका किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुण्यात ढगफुटीने सात जणांचा मृत्यू; मोठे नुकसान

सकाळी आठ वाजेपर्यंत तीन मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरीक आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे.

पुण्यात ढगफुटी; 87.3 मिमी पावसाची नोंद; आठ वर्षांतील उच्चांक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood situation in Shivapur area three people dead