पुणे विमानतळावरील पाण्याच्या बाटलीवरून चिदंबरम झाले ट्रोल!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

विमानतळावरील खाद्यपदार्थांचे दर जास्त आहेत, म्हणून अनेक प्रवाशांनी या निमित्ताने नाराजीही व्यक्त केली.

पुणे : 'पुणे विमानतळावर पिण्याच्या पाण्याची बाटली 60 रुपयांना कशी विकली जाते, व्हेंडिंग मशीन बसविले, तर तिची किंमत 25 रुपयांपर्यंत खाली आणता येईल,' असे ट्‌विट करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना या विषयावरून नेटिझन्सनी शनिवारी (ता.8) ट्रोल केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिदंबरम एका कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी चार तासांसाठी पुण्यात आले होते. परतत असताना त्यांनी पिण्याच्या पाण्याची बाटली पुण्यातील लोहगाव विमानतळावर 60 रुपयांना मिळते, असे ट्‌विट केले. तसेच त्यासाठी व्हेंडिंग मशीन बसविण्याचाही सल्ला दिला.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना त्यांनी टॅग केले होते. त्यावर पुणे विमानतळाच्या हॅंडलवरून लगेचच रिप्लाय देण्यात आला. त्यात, 'गृहमंत्र्यांची सूचना स्वागतहार्य आहे. व्हेंडिग मशीन लवकरच बसविण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्नशील आहे,' असे सांगण्यात आले.

- अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक

त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा ट्‌विट केले. त्यात 'पुणे विमानतळावर पिण्याचे पाणी ग्लाससह मोफत उपलब्ध आहे. तसेच पहिल्या मजल्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली दहा रुपयांना, चहा 20 रुपयांना आणि कॉफी 25 रुपयांना उपलब्ध आहे,' असे निदर्शनास आणून देण्यात आले.

- लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम

या ट्‌विटचे नेटिझन्सने मोठ्या प्रमाणात स्वागत केले. आयटी प्रोफेशनल पी. के. नायर म्हणाल्या, ''पुणे विमानतळावरील सुविधेबाबत ट्विट केले, तर प्रशासन लगेचच त्याची दखल घेते. असा अनुभव मलाही या पूर्वी आला आहे. खरोखरच विमानतळ प्रशासन ऍक्‍टिव्ह आहे.'

- धक्कादायक : चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलं जातंय कासवाचं मांस

मात्र, विमानतळावरील सुविधांची पुरेशी माहिती न घेता चिदंबरम यांनी केलेल्या ट्विटबद्दल नेटिझन्सनी उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच विमानतळावरील खाद्यपदार्थांचे दर जास्त आहेत, म्हणून अनेक प्रवाशांनी या निमित्ताने नाराजीही व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Union Minister P Chidambaram trolled about Pune Airport water bottle issue