हडपसर परिसरात गॅस पाईपलाईनमधून होत होती गॅस गळती, पण...

Gas-Leakage
Gas-Leakage

मांजरी : पुणे-सोलापूर महामार्गावरील रविदर्शन सोसायटी आणि साधना सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका ठिकाणी गॅस गळती होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

शनिवारी (ता.15) दुपारी साडेबाराच्या सुमारास एमएनजीएल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमधून गॅस गळती होत होती. मात्र, नागरिकांनी वेळीच दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळण्यास मदत झाली. गॅस गळतीचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

दरम्यान अग्निशामक दलाने तात्काळ येथे येऊन गॅस पाईपलाईन बंद केली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. एमएनजीएल प्रशासनालाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. त्यांनी पाईपची दुरुस्ती केली. 

आज सकाळी येथे गॅसचा वास येत होता. परिसरातील नागरिक त्यामुळे घाबरून गेले होते. या ठिकाणी गॅस गळती होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सांगितले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली. दुपारी एमएनजीएल प्रशासनांची गाडी व कर्मचारी येथे आले. त्यांनी ही गळती बंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com