esakal | 'जिल्ह्यातील दिव्यांगाना कोविड प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने द्या'

बोलून बातमी शोधा

vaccine to the disabled
'जिल्ह्यातील दिव्यांगाना कोविड प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने द्या'
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : “पुणे जिल्ह्यातील २८ हजार ३१६ अंध, मतिमंद व अस्थिव्यंग असणाऱ्या दिव्यांगाना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस त्याच गावातील कोव्हिड सेन्टरमध्ये रांग न लावता प्राधान्याने द्यावी. या पेकी १५ टक्के अतितीव्र असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोव्हीड सेंटरवर लस घेण्यासाठी व पुन्हा घरी सोडण्यासाठी प्रशासनाने व्यवस्था करावी.” अशी मागणी दिव्यांग संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष समीर टाव्हरे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, “ पुणे जिल्ह्यात एकूण दिव्यांग व्यक्तींपैकी चार हजार २४७ आतितिव्र स्वरुपाचे दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना बेडवर झोपूनच राहावे लागते. घराबाहेर त्यांना पडता येत नाहीत. या पैकी काही दिव्यांग व्यक्तींची परिस्थिती फारच बिकट आहे. ते निराधार आहेत. अशा दिव्यांग व्यक्तींना सरकारी रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेतून ने-आण करण्याची जबाबदारी गाव पातळीवर ग्रामपंचायतीचे संरपच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातुन करण्याबाबत आदेश पारित व्हावेत.”

हेही वाचा: पुणे : रिंगरोडच्या कामाला मिळणार गती

“रुग्णवाहिकेसाठी ग्रामपंचायत स्तरावर पडून असलेला अपंग कल्याण निधी किंवा ग्रामनिधीचा वापर करावा. याकामी पंचायत समिती गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियोजन करावे.” असे ही टाव्हरे यांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.” दरम्यान दिव्यांग व्यक्तींना सरकारी दवाखान्यात प्राधान्याने प्रतिबंधात्मक कोव्हीड लस द्यावी. असे आदेश केंद्र सरकारच्या दिव्यांग विभागाचे सचिव डी.के. पंडा यांनी सोमवारी (ता.२६) रोजी सर्व राज्यांना व आरोग्य विभागाला दिले आहेत, असे आंबेगाव तालुका दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सुनील दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: गृहमंत्र्यांकडून मंचर व घोडेगाव रुग्णालयांसाठी एक कोटी 21 लाख

आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर, वेल्हे या तालूक्यातील काही भाग डोंगरी, दुर्गम आहे. सद्यस्थितीत दळववळणाच्या कुठल्याही सुविधा नाहीत. तेथील दिव्यांग व्यक्तींना कोव्हिड सेन्टर पर्यंत ये-जा करणे शक्य होत नाही. उन्हाळ्याची तीव्रता खुप वाढलेली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पुणे जिल्हा परिषद दिव्यांग व्यकतीच्या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे.-ज्ञानेश्वर शिंदे, संस्थापक दिव्यांग संघटना आंबेगाव तालुका

हेही वाचा: मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'