गोवा निर्मित सव्वा कोटींची अवैध दारु पुण्यात पकडली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र भरारी पथकाने रविवारी पहाटे सापळा रचून, लोणावळ्याजवळील पुणे-मुंबई महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ कंटेनर क्रमांक ४६ एच-३५३४ ची तपासणी केली.चालकाकडील बिल्टी आणि इतर कागदपत्रात तफावत आढळल्याने कंटेनरचे सिल तोडण्यात आले. कंटेनर उघडला असता आत खोक्यात भरलेल्या गोवा निर्मित माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या १४ हजार ४०० बाटल्या,१८० मिलीच्या ३८ हजार ४०० बाटल्या अशी एकूण १७ हजार सातशे १२ बल्क लिटर दारु आढळली.

तळेगाव दाभाडे(पुणे) : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि तळेगाव दाभाडे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत आज रविवारी (ता.२२) पहाटे सव्वातीनच्या सुमारास कुसगाव-वरसोली टोलनाक्याजवळ केलेल्या कारवाईत १ कोटी २४ लाख ८० हजार रुपयांचे गोवा निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधीत मदय जप्त करण्यात आले.

नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत

खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र भरारी पथकाने रविवारी पहाटे सापळा रचून,लोणावळ्याजवळील पुणे-मुंबई महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ कंटेनर क्रमांक ४६ एच-३५३४ ची तपासणी केली.चालकाकडील बिल्टी आणि इतर कागदपत्रात तफावत आढळल्याने कंटेनरचे सिल तोडण्यात आले. कंटेनर उघडला असता आत खोक्यात भरलेल्या गोवा निर्मित माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या १४ हजार ४०० बाटल्या,१८० मिलीच्या ३८ हजार ४०० बाटल्या अशी एकूण १७ हजार सातशे १२ बल्क लिटर दारु आढळली.
पुणे धावले! बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

सदर बेकायदेशीर मदयाची किंमत १ कोटी ४६ लाख रुपयांहून अधिक आहे.नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, मदय माफीयांचे धाबे दणाणले आहेत.कंटेनर चालक राजेश रत्नाकरन कुरुवाट (२८,कोलमपारा, कुरावकावल्लापालन,मु. किड़माला, पा. करिडालम जि. कासारागोड, केरळ राज्य) आणि क्लिनर विजित श्रीधरन कानाकुलथ (२८,घर नं. ४/१९८-ए, मदाथिल, मु. कुडोल पो. बीरीकुलम, पाराप्पा रोड, जि. कासारगोड, केरळ राज्य) या दोघांना कंटेनर आणि दिड कोटींच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटचा तीर्थ पुन विजेता

पथकाचे निरीक्षक दिपक परब,दुय्यम सहाय्यक प्रमोद कांबळे, जवान विशाल बस्ताव, सुरेश शेगर,सदाशिव जाधव तसेच तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक आर.एल. खोत, नरेंद्र होलमुखे आणि सहकार्यांच्या मदतीने कारावाई करण्यात आली.

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa made illegal liquor worth all crores seized in pune