पुणेकरांनी सुचवलेल्या 'त्या' 450 हरकतींवरील सुनावणीस सुरवात

Pune-HCMTR
Pune-HCMTR

पुणे : उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) आखणीतील बदलाबाबत पुणेकरांनी साडेचारशे हरकती-सूचना नोंदविल्या असून, त्यापैकी सुमारे सव्वातीनशे हरकती एरंवडणा भागांतील लोकांच्या आहेत.

त्यावर या प्रकल्पाच्या हरकतींवरील सुनावणी बुधवार (ता.20) पासून सुरुवात झाली. येत्या 30 नोव्हेंबर सुनावणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान 25 ते 30 नोव्हेंबर या काळातही हरकती घेता येणार आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी फोडून ती सुरळीत आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आखलेल्या 'एचसीएमटीआर' मार्गात काही बदल सूचविण्यात आले होते. त्यानुसार 11 किलोमीटरच्या अंतरात बदल केला आहे. त्याबाबत लोकांकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या.

त्यानुसार महापालिकेच्या मुदतीत सुमारे 421 जणांनी बदलासंदर्भात आक्षेप घेतले होते. त्यानुसार सुनावणी झाली आहे. या हरकतींवरील सुनावणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पुढील चार दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे. 

एरंडवणा परिसरासह मार्गात बदल झालेल्या कर्वेनगर, कोथरूड, वडगावशेरी, पर्वती भागांतील नागरिकांनीही आपल्या सूचना मांडल्यात आहेत. तर हिंगणे आणि बिबवेवाडी या परिसरातून केवळ एकाच व्यक्तीने हरकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनावणी झाल्यानंतर तिचा एकत्रित अहवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येईल. तिच्या मंजुरीनंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com