
कळमोडी (ता. खेड) : धरणाची उंची दोन मिटरने वाढवून खेड तालुक्याच्या पुर्व पट्यातील वाफगाव, कणेसरच्या पट्यात पाणी नेवून तेथील दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतीपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कळमोडी धरणाच्या जलपुजन प्रसंगी व्य़क्त केले.
चास-कमान धरणाच्या पाण्यापासून वंच्छित राहिलेल्या खेड तालुक्यातील क्षेत्रासह आंबेगाव तालुक्यातील सातगांव पठार भागास वरदान ठरणाऱ्या कळमोडी धरणाचा पाणीसाठा मंगळवार ता. 11 रोजी शंभर टक्के झाला असून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. धरण शंभर टक्के भरल्याने धरणातील जलाचे पुजन शनिवार ता. 15 रोजी आमदार दिलीप मेहिते पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ, पुष्प व साडी-चोळी अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे, सचिन शिंदे, सुप्रिया तनपुरे, आशा काठे, शाखा अभियंता उत्तम राऊत, रोहिदास नाईकडे, आमदारांच्या समवेत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, मा. जि.प.सदस्य अशोक शेंडे, सुभाष होले, बाळासाहेब गोपाळे, लक्ष्मण मुके यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोठी बातमी : जुन्या कपड्यांनी उलगडला कोट्यधींचा कर गैरव्यवहार; बोगस कोडवरून चढ्या भावाने निर्यात
यावेळी बोलताना आमदार मोहिते म्हणाले की कळमोडी धरणाची उंची वाढवल्याने धरणाचा पाणीसाठा 1.51 टीएमसी वरून 2 टीएमसी होणार आहे, यामुळे पाणीसाठा वाढून खेड तालुक्याच्या पुर्व पट्यातील गावांना पाणी देता येईल व त्याचबरोबर कळमोडी धरण हे चास-कमान पेक्षा 125 फुटांनी उंच असून या धरणातून विजेविना सायपन पद्धतीने खेड तालुक्याच्या पन्नास टक्के पेक्षा अधिक भागांना पाणीयोजना करणे शक्य होणार असून त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.