Pune Crime News : आईचे हाल पाहावत नाहीत..... चिठ्ठी लिहून माय-लेकीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
पुणे : आईचे हाल पाहावत नाहीत..... चिठ्ठी लिहून माय-लेकीची आत्महत्या

पुणे : आईचे हाल पाहावत नाहीत..... चिठ्ठी लिहून माय-लेकीची आत्महत्या

किरकटवाडी: "आजारपणामुळे होणारे आईचे हाल आता पाहावत नाहीत.... आमच्या आत्महत्येला(sucide case) कोणालाही जबाबदार धरु नयेत, पोलीसांनी घरच्यांना त्रास देऊ नये", अशी चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणी व 48 वर्षीय आईने आत्महत्या केली आहे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली असून रेवा दत्तात्रय खपाले (मुलगी) व संगीता दत्तात्रय खपाले (आई) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा: पुणे : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता खपाले यांना मागील काही वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रासले होते. तसेच त्यांची घरची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. किरकटवाडी येथे एक मुलगा व दोघी माय-लेकी भाड्याच्या घरात राहत होते. मोठी मुलगी विवाहित असून ती खडकवासला येथे राहण्यास आहे. आजारपणामुळे संगीता यांना हालचाल करणे कठीण झाले होते. मुलगी रेवा ही घरी राहून आईची काळजी घेत होती. दत्तात्रय खपाले हे मुळ गावी सोलापूर येथे शेती करण्यासाठी राहत होते.

हेही वाचा: आणखी चार आमदार यूपी भाजप सोडतील; शरद पवार यांचं सुतोवाच

गुरुवारी दि. 13 जानेवारी रोजी रात्रीचे जेवन करुन माय-लेकी व मुलगा झोपले. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास मुलगा पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर घरातील लाईटचे बटन चालू केले असता आतल्या खोलीत बहीण व आईने गळफास घेतल्याचे(sucide news) दिसून आले. त्याने ही माहिती खडकवासला(khadakwasla) येथे राहणाऱ्या त्याच्या मोठ्या बहीणीस दिली. मोठी बहीण घरी आल्यानंतर हवेली पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. तातडीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस नाईक रुपाली धिवार,विजय कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल रजनीकांत खंडाळे हे खटनास्थळी दाखल झाले. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात (sasson hospital )पाठविण्यात आले आहेत. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrimesucide case
loading image
go to top