Maharashtra Weather Alert
esakal
पुणे : राज्यात आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Maharashtra Rain Alert) वर्तवला आहे. विशेषतः अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, शेतीकाम करताना किंवा प्रवास करताना नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.