Video : केरळहून मसाल्यांऐवजी आला 24 पोती गुटखा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

कोथरूडच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या पथकातील पोलिसांनी छापा टाकून 21 पोती गुटखा, पानमसाला आणि तीन पोते जर्दा जप्त केला.

पुणे : केरळ राज्य मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे; परंतु केरळमधून रविवारी (ता.9) मसाल्यांऐवजी चक्‍क गुटखा आणि जर्दा पुणे शहरात आणला गेल्याची बाब पोलिसांच्या छाप्यातून समोर आली आहे. कोथरूड पोलिसांनी जर्दा आणि गुटख्याची 24 पोती जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

- पुणे विद्यापीठातील संशोधकाला आयुर्वेदीक औषधाचे पेटंट!

कोथरूड येथील उजव्या भुसारी कॉलनीत रविवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना एका टेम्पोमध्ये गुटखा आणि जर्दा आल्याची माहिती मिळाली. त्यावर कोथरूडच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या पथकातील पोलिसांनी छापा टाकून 21 पोती गुटखा, पानमसाला आणि तीन पोते जर्दा जप्त केला.

- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी

या प्रकरणी पोलिसांनी एका व्यापाऱ्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी जर्दा आणि गुटख्याची पोती अन्न आणि औषध प्रशासनाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- पवार, गडकरी एकाच व्यासपीठावर; 'या' अडचणींवर मात करण्यासाठी एकत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instead of spices from Kerala brought 24 bags of gutkha in Pune on Sunday