पीएमपीच्या संचालक बदलाचा वाद पोचला पोलिसांपर्यंत

पीएमपीचे संचालकपद बदलण्याच्या वादातून स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या.
पीएमपीच्या संचालक बदलाचा वाद पोचला पोलिसांपर्यंत

पुणे - पीएमपीचे (PMP) संचालकपद (Director) बदलण्याच्या वादातून (Dispute) स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये (Police Station) शुक्रवारी परस्परविरोधी तक्रारी (Complaint) दाखल झाल्या. या घटनेमुळे संचालक बदलण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पीएमपीएमएलने महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, तर पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप (Rajendra Jagtap) यांनी धमकी दिल्याची तक्रार त्या दोन कर्मचाऱ्यांनी स्वारगेट पोलिसांकडे दिली आहे. दोन्ही तक्रारींबाबत स्वारगेट पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. (Issue of PMPs Change of Director Reached the Police)

मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत आणि झूम मिटिंगच्या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पीएमपीचे माजी संचालक शंकर पवार शुक्रवारी दुपारी पीएमपीच्या कार्यालयात गेले. पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप रजेवर होते. संचालक मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत मिळावा यासाठी मोहोळ आणि पवार यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. संचालक मंडळाच्या झूम मिटींगचे रेकॉर्डिंग प्रशासनाने देण्याची तयारी दर्शवली. परंतु बैठकीचा वृत्तांत अद्याप तयार नसल्यामुळे नंतर देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर महापौर मोहोळ यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात जाऊन तेथील संगणक सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीएमपीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अटकाव केला आणि स्वारगेट पोलिसांना पाचारण केले. या घटनेनंतर महापौर मोहोळ आणि पवार तेथून निघून गेले. पीएमपीने याबाबत स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर महापालिकेच्या दोन संबंधित कर्मचाऱ्यांनीही स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली, त्यात पीएमपीचे अध्यक्ष डॉक्टर जगताप यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे धमकी दिल्याचे म्हटले आहे.

पीएमपीच्या संचालक बदलाचा वाद पोचला पोलिसांपर्यंत
पुण्यात दिवसभरात ३४९ कोरोना रुग्ण; बाधितांचा दर ५.५ टक्के

या घटनेबाबत महापौर मोहोळ म्हणाले, "संचालक मंडळीच्या बैठकीचा वृत्तांत आणि झूम मिटींगचे रेकॉर्डिंग जगताप यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे पीएमपीच्या संचालक मंडळाला उपलब्ध करून देणे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु ते न करता जगताप या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत".

याबाबत स्वारगेट पोलिसांकडे विचारणा केली असता दोन्ही बाजूच्या तक्रारी मिळाले आहे त्यावर शनिवारी कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता ते उपलब्ध झाले नाहीत. मात्र पीएमपी कार्यालयातील संबंधित अधिकारी म्हणाले, "बैठकीचा वृत्तांत आणि झूम कॉल रेकॉर्डिंग मागण्यासाठी एक प्रक्रिया असते त्याची अंमलबजावणी महापौर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे न करता दमबाजी केली."

पीएमपीच्या संचालकपदाचा शंकर पवार यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यावरून सध्या भाजप वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com