जुई धायगुडे पांडे यांना माणिक वर्मा पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे भारत गायन समाजातर्फे दिल्या जाणार्‍या कै. माणिक वर्मा पुरस्कारासाठी यावर्षी जयपूर- अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका श्रीमती जुई धायगुडे-पांडे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे : पुणे भारत गायन समाजातर्फे दिल्या जाणार्‍या कै. माणिक वर्मा पुरस्कारासाठी यावर्षी जयपूर- अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका श्रीमती जुई धायगुडे-पांडे यांची निवड करण्यात आली आहे.

पुण्यात मोबाईल फेकून मारल्याने फुटले महिलेचे डोकं 

या पुरस्काराचे वितरण शनिवार १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे भारत गायन समाज येथे होणार आहे. रोख रक्कम ५००० रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नजरेला नजर भिडताच झाला राडा; शाहरुखने दिली तक्रार

जुई धायगुडे-पांडे या जयपूर गायकीचे श्रेष्ठ गायक डॉ. अरुण द्रविड यांच्या शिष्या आहेत. द्रविड हे गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचे जेष्ठ शिष्य आहेत. 

पुणे : लोणीकंद तलावात आढळले दोन मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jui Dhaygude-Pande awarded with Manik Verma Award