कसारा घाटातील विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक रद्द!

कसारा घाटातील विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक रद्द!
Published on: 

कसारा घाटातील विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक रद्द! सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १९ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) कामासाठी अडथळे दूर करण्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा येथे घेण्यात येणारे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी-खर्डी यादरम्यानच्या कसारा सेक्शनमध्ये १९ ते २२ मे या कालावधीत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव हे ब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे या कालावधीत नियोजित ब्लॉकमुळे होणारा संभाव्य रेल्वे वाहतुकीवरील परिणाम टळणार असून, नियमित रेल्वेसेवा सुरळीत सुरू राहणार आहे. संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Asangaon Kasara railway block
Mumbai Bengaluru Special Train
Diwali Special Train 2026
Mumbai Local Megablock
Marathi News Esakal
www.esakal.com