

खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशातील तूर लागवड यंदा स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ ते १२ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खानदेशातील काही भाग तूर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. २०२३-२४ हंगामात तुरीला प्रतिक्विंटल तब्बल १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याने २०२४-२५ मध्ये तूर लागवडीत वाढ झाली होती. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली होती, तर संपूर्ण खानदेशातील लागवड क्षेत्र सुमारे १८ हजार हेक्टर होते.
मात्र यंदा तूर लागवडीत फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. खानदेशात कापूस हे प्रमुख पीक असून कापसाची लागवड कमी झाल्यासच शेतकरी तूर किंवा अन्य पिकांकडे वळतात. यंदा कापसाचा हमीभाव वाढला असून बाजारभावही स्थिर आहेत. त्यामुळे कापूस क्षेत्रात मोठी घट अपेक्षित नसल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात.
दरम्यान, बागायती तूर लागवड काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर परिसर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि तळोदा भागात बागायती तूर लागवड केली जाते. अनेक शेतकरी कापसामध्ये आंतरपीक म्हणूनही तुरीचे उत्पादन घेतात.
खानदेशातील अनेक शेतकरी जून महिन्यात ठिबक सिंचनाच्या साहाय्याने बागायती तुरीची लागवड सुरू करतात. यंदा तिन्ही जिल्ह्यांत मिळून तूर लागवड १८ ते १९ हजार हेक्टरदरम्यान राहण्याचा अंदाज असून त्यात जळगाव जिल्ह्याचा वाटा अधिक राहणार आहे.
--
लागवडीविषयी महत्त्वाचे
बाब आकडेवारी
जळगाव जिल्ह्यात अपेक्षित लागवड - ११ ते १२ हजार हेक्टर
खानदेशातील मागील हंगामातील लागवड - सुमारे १८ हजार हेक्टर
यंदाची संभाव्य लागवड - १८ ते १९ हजार हेक्टर
तुरीचा मागील कमाल दर - १२ हजार रु./क्विंटल
प्रमुख तूर पट्टे - मुक्ताईनगर, रावेर, नवापूर, तळोदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.