
खराडी : केशवनगरला जोडणाऱ्या जॅकवेल बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असताना पुरात वाहून जाण्याची शक्यता असलेल्या तरुणाला खराडी पोलिसांनी वाचवून जीवनदान दिले. त्यांनी केलेल्या धाडसी कार्याबद्दल चंदननगरमधील क्रांतिसूर्य महात्मा फुले युवा प्रतिष्ठान व पोलिस मित्र संघटनेच्या वतीने पोलिसांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.