पुणे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती झाल्या मालामाल; तर ६०६ ग्रामपंचायतींना फटका!

Grampanchyat
Grampanchyat

पुणे - मुद्रांक शुल्क अनुदानापोटी जिल्हा परिषदेला आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना तब्बल ११३  कोटी ९६ लाख ६४ हजार ८०९ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना किमान साडेतीन हजार ते कमाल अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील (पीएमआरडीए)  ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या मुद्रांक शुल्क अनुदानापैकी २५ टक्के म्हणजेच एकूण दहा कोटी ६४ लाख ८७ हजार ८७८ रुपयांचा निधी यंदा पहिल्यांदाच पीएमआरडीएला वर्ग करावा लागला आहे. यामुळे या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ६०६ वितरित करण्यात आला आहे. परिणामी या ६०६ ग्रामपंचायतींच्या मुद्रांक शुल्क अनुदानात आता कायमची निम्म्याने घट झाली आहे. 

जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून राज्य सरकारकडे जमा होणाऱ्या एकूण मुद्रांक शुल्क अनुदानापैकी एक टक्का रक्कम ही जिल्हा परिषदेला प्राप्त होत असते. यापैकी निम्मी-निम्मी रक्कम अनुक्रमे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींना मिळत असते. ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या ५० टक्के अनुदानापैकी २५ टक्के म्हणजेच निम्मा निधी पीएमआरडीएला देण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने २०१९ घेतला आहे. या निर्णयानुसार नोव्हेंबर २०१९ पासून हा निधी पीएमआरडीएला देण्याचा सरकारचा आदेश आहे.

राज्य सरकारकडून  सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील मुद्रांक शुल्क अनुदानाची १९७  कोटी १५ लाख १४ हजार रुपयांची रक्कम नुकतीच पुणे जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. यापैकी ९८  कोटी ५७  लाख ५७ हजार रुपये आणि याआधीची ८९  कोटी पाच लाख रुपये, अशी एकूण १८७  कोटी ६२ लाख ५७ हजार रुपये ग्रामपंचायतींना वाटपासाठी  उपलब्ध झाले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात १८०  कोटी ४० लाख ४८ हजार रुपयांची  अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली होती. या एकूण तरतुदीपैकी ११३ कोटी ९६ लाख ६४ हजार रुपयांचे  ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले आहे. 

आणखी ६६ कोटींचे वाटप - निर्मला पानसरे 
अंदाजपत्रकीय मुद्रांक शुल्क अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलेल्या निधीनंतरही ६६ कोटी ३३ लाख चार हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे. या निधीचेही लवकरच वाटप केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले. 

ग्रामपंचायत संक्षिप्त माहिती 
- जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती --- १३९९.
- नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती ---- ०८.
- पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींची संख्या --- ६०६.
- जिल्हा परिषदेच्या कार्य क्षेत्रातील ग्रामपंचायती ---- ८०१.

पंढरपूरची वारी करण्यासाठी तरुणाने लडढवली शक्कल

पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क अनुदानापैकी २५ टक्के म्हणजेच निम्मा निधी पीएमआरडीएला वर्ग करण्याचा  सरकारचा निर्णय आहे. यानुसार नियमानुसार पीएमआरडीएकडे हा निधी वर्ग करण्यात आला आहे. 
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com