दोघी तोडत होत्या मिरच्या...मागे पहितले तर दिसला बिबट्या...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कडुसकर कुटुंबीयांची शेती उसाच्या शेतालगत आहे. शैला व साक्षी दोघी जणी मिरचीच्या शेतात सोमवारी सकाळी तोडणीचे काम करत होत्या. काही तरी आवाज आल्याने शैला यांचे लक्ष पाठीमागे गेले. पाहते तर काय १०० फूट अंतराहून बिबट्या आपल्याकडे येत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने क्षणाचाही विलंब न करता आरडा ओरड केला.

म्हाळुंगे पडवळ : साकोरे (ता.आंबेगाव) येथील कडुसकरमळ्यात सोमवारी (ता.२९) सकाळी साडे आठ वाजता शैला किसन कडुसकर (वय ५०) व नात साक्षी (वय १५) दोघी जणी शेतात मिरचीची तोडणी काम करत होत्या. आवाज आल्याने पाठीमागे पाहिल्यानंतर बिबट्या हल्ला करण्याच्या उद्देशाने येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरडाओरड करून धैर्याने प्रतिकार केल्यामुळे दोघींचा जीव वाचविण्यात यश आले. घडलेल्या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कडुसकर कुटुंबीयांची शेती उसाच्या शेतालगत आहे. शैला व साक्षी दोघी जणी मिरचीच्या शेतात सोमवारी सकाळी तोडणीचे काम करत होत्या. काही तरी आवाज आल्याने शैला यांचे लक्ष पाठीमागे गेले. पाहते तर काय १०० फूट अंतराहून बिबट्या आपल्याकडे येत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने क्षणाचाही विलंब न करता आरडा ओरड केला. त्यावेळी जवळच पिकांना पाणी देत असलेले कांतिलाल गाडे, राजू काळे व अन्य नागरिक मदतीसाठी धावून आले. तो पर्यत बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला. सुर्देवाने कोणतीही दुखापत झाली नाही. घडलेल्या प्रकाराची माहिती वनविभागाचे अधिकारी राजेंद्र गाढवे यांना सदर प्रकार ग्रामस्थांनी कळविण्यात आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. घडलेल्या प्रकारामुळे साकोरे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

एक वर्षापूर्वी याच परिसरात शेतात खेळत असलेल्या चिमुकलीवर बिबट्याने झडप घालून तिला ठार केले होते. बिबट्याने यापूर्वी अनेकदा हल्ला करून पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. सोमवारी सकाळी महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरातील नागरिकांना दिवसाही बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतावर जाणे देखिल धोक्याचे होऊ लागले आहे. वनखात्याने परिसरात वावर असलेल्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा,’’ अशी मागणी अॅड. विनोद चासकर व शरद कडुसकर यांनी केली आहे. 
                                                                  
StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

‘‘नेहमीप्रमाणे मिरची तोडणीचे काम करत असताना बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. क्षणाचाही विलंब न करता आरडाओरड करून प्रतिकार केला. त्यामुळे दोघींचा जीव वाचला आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी अवस्था झाली होती,’’ असे शैला कडुसकर यांनी सांगितले.  

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attack on two in Sakore village