Lockdown : राज्य सरकारने खासगी दूध संघाचे अतिरिक्त दूध खरेदी करावे : कुतवळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध सरकारमार्फत खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केवळ सहकारीच नव्हे, तर खासगी दूध संघांचेही अतिरिक्त दूध खरेदी करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहकारी असो की खासगी दूध संघ, हे सर्व संघ शेतकऱ्यांकडूनच दूध खरेदी करत असतात. त्यातही राज्यातील एकूण दूध उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के दूध हे खासगी दूध संघ खरेदी करत असतात. सहकारी संघांचा खरेदीचा वाटा हा केवळ २० टक्केच असल्याचेही कुतवळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

- महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

राज्य सरकारने सोमवारपासून (आजपासून) सहकारी दूध संघाकडील अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या दुधापासून पावडर तयार केले जाणार आहे. या पावडरसाठी ४ खासगी पावडर निर्मिती प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित सहकारी दूध संघांनी खरेदी केलेले अतिरिक्त दूध निवड करण्यात आलेल्यापैकी जवळच्या  पावडर प्लॅंटमध्ये जाऊन ते तेथे देण्यास सुरुवात केली आहे. 

- ...या ग्रंथात दिला आहे सोशल डिस्टंसिंगचा संदेश

राज्यात संचारबंदी चालू असल्याने दुधाच्या मागणीत घट झाली. परिणामी सहकारी दूध संघांनी मागणीवर आधारित खरेदी करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्यांकडील दूध अतिरिक्त राहू लागले. याचाच फायदा घेण्यासाठी खासगी दूध संघांनीही खरेदी दर खूप मोठ्या प्रमाणात कमी केले. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते.

- Coronavirus : २४ तासांत कोरोनाच्या ६९३ नव्या केसेस; तबलिगींच्या संपर्कात...

यावर मार्ग काढण्यासाठी राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध सरकारमार्फत खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यानुसार येत्या ३१ मेपर्यंत प्रतिलिटर २५ रुपये दराने हे दूध खरेदी करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Private milk companies approach state govt for buying extra milk