कोरेगाव भीमा शौर्य दिन : जातीय सलोख्याची परंपरा जपावी: अजित पवार

Maintain a tradition of ethnic harmony Said Ajit Pawar
Maintain a tradition of ethnic harmony Said Ajit Pawar

पुणे : ''कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कारण जातीय सलोखा कायम राखत आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा असून, ती आपण जतन केली पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरेगाव भीमा : विजयस्तंभास अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन

कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी (ता. 1) अभिवादन केले. आमदार अशोक पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

कोरेगाव भीमाला जातायं? असा आहे वाहतुकीचा मार्ग

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरेगाव भीमा येथील शौर्यस्तंभाला एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. राज्यातील जनतेच्या वतीने येथील शौर्यस्तंभास मी अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार चांगल्या प्रकारची खबरदारी घेत आहे. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरातून नागरिक या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात. शूर-वीरांची आठवण ठेवत त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com