esakal | बाजारपेठेवरचं "विघ्न' हळूहळू होतयं दूर 
sakal

बोलून बातमी शोधा

market.jpg

कोरोनामुळे गेली पाच महिने गडद झालेले बाजारपेठेवरचे विघ्न उद्या येणारा विघ्नहर्ता दूर करेल, अशी प्रार्थना बाजारातील सर्वच व्यापारी करत आहेत.

बाजारपेठेवरचं "विघ्न' हळूहळू होतयं दूर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : "विघ्नहर्ताच्या उत्सवाला सुरवात होत आहे. बाजारपेठेचे विघ्न नक्कीच दूर होईल. ग्राहकांच्या मनातील भीती आता दूर झाली आहे, सुरक्षितता बाळगून ते खरेदीसाठी बाहेर पडत आहे. बाजारपेठ पुन्हा सावरू लागली आहे,' असे पूना गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ सांगत होते. 

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

कोरोनामुळे गेली पाच महिने गडद झालेले बाजारपेठेवरचे विघ्न उद्या येणारा विघ्नहर्ता दूर करेल, अशी प्रार्थना बाजारातील सर्वच व्यापारी करत आहेत. सध्या शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. खरंतर श्रावण आणि त्यानंतर सणासुदीचा काळ सुरू होते. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यांपासून बाजारपेठेत गर्दी उसळू लागते.

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत   

यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेचे रूपडे बदलले आहे. दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर सुरूवातील ग्राहकांची वाट बघण्यात दिवस जात होता. आता मात्र हळूहळू हे चित्र बदलू लागले आहेत. नागरिक ही सुरक्षितता घेऊनच बाहेर पडत असल्यामुळे बाजार पेठेतील गर्दी वाढू वाढल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

 ज्येष्ठांना हवीत सुविधासंपन्न जीवनशैलीची घरे

याबाबत गाडगीळ म्हणतात,"" गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. वेढणी आणि चोख सोने खरेदीवर त्यांचा भर आहे. तर "श्री'ची चांदीची मूर्ती आणि दागिन्यांना मागणी जास्त आहे.'' 

 Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

गणेशोत्सव म्हणजे विघ्नहर्ताचा उत्सव. त्यामुळे शुभमुहूर्ताचे निमित्त साधून नवीन वस्तू घरात आणण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा देखील त्रास सहन करावा लागला. बप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी झालेल्या गर्दीने दुकाने देखील फुलून गेली होती. या पुढील काळात ही अशीच बाजारपेठ ग्राहकांनी फुलू दे, अशी प्रार्थना व्यापारी वर्गाकडून मनोमन व्यक्त केली जात असल्याचे दिसून आले. 


ग्राहक येण्यास सुरवात झाली आहे. परंतु कपड्यांना म्हणावे तसे ग्राहक अजून नाही. येथून पुढच्या काळात वाढतील, अशी अपेक्षा आहे. 
-पंढरीनाथ कुऱ्हाडे , ( वस्त्रांगणा साडी सेंटर) 


लॉकडाऊन नंतरचा काळ आणि आताच्या काळात बराच फरक पडला आहे. ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. हळूहळू व्यापारी पूर्वपदावर येऊ लागला आहे. 
-सुरेश जैन, (प्लॅस्टिक वस्तूचे व्यापारी) 

loading image
go to top