पोलिसांना ती म्हणाली, आम्हाला लग्न करायचेय....

Minor girl abducted from Karnataka Rescued in Pune
Minor girl abducted from Karnataka Rescued in Pune

पुणे : लग्न करण्याचा बहाणा करुन कर्नाटक येथून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. मुलीला तिच्या पालकांच्या, तर आरोपीस कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबरोबरच लोहमार्ग पोलिसांच्या दामिनी पथकाने अपहरण झालेल्या, घरून पळून आलेल्या नऊ अल्पवयीन मुला-मुलींना त्यांच्या पालकांकडे सुखरुप सुपुर्द केले. 

प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या अफवा सोशल मिडियावर व्हायरल; हे आहे सत्य

संगीता (नाव बदलले आहे) ही 17 वर्षांची मुलगी 22 वर्षाच्या तरुणासमवेत सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर फिरत होती. त्यावेळी गस्तीवर असणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या दामिनी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवून विचारणा केली. त्यावेळी दोघेजण कर्नाटकमधील शहाबाद येथील असल्याचे तसेच ते लग्न करण्यासाठी घरून पळून आल्याबाबतची माहिती त्यांनी दिली. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याबाबत अधिक माहिती घेतली. त्यावेळी शहाबाद येथे मुलीचे अपहरण झाल्याबाबतची तक्रार दाखल असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे आरोपीला दिले. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले. 

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी मळवली, तळवडे, म्हापसा (गोवा), कोल्हापुर, पनवेल (रायगड) येथून पळून आलेल्या चार अल्पवयीन मुली व चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरुप पोचविले. तर अन्य अल्पवयीन मुला-मुलींना त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना होऊ नयेत, यासाठी बाल कल्याण समितीसमोर हजर करून वेगवेगळ्या ठिकाणच्या सुधारगृहामध्ये पाठविले.

तुम्हाला माहिती आहे कुठे मिळतो चायनीज मांजा? मग पोलिसांना सांगा कारण..
पुणे लोहमार्गचे पोलिस अधिक्षक दिपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, दामिनी पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनिषा वळसे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांचन आल्हाट, पोलिस कर्मचारी निशा ओव्हाळ, साधना वाघमारे, संतोषी ढेंबरे यांच्या पथकासह साथी संस्थेच्या करुणा मेश्राम, अमृता बळगानुरे यांनी ही कारवाई केली. 

पुणे : तेलाचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही

 "अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून आणले जाते. त्यानंतर त्यांना वेगळ्या मार्गाला लावले जाते. असे प्रकार घडू नयेत व नागरीकांनीही सतर्क राहावे, यादृष्टीने या कारवाईला प्राधान्य देण्यात येते.''
- सुरेशसिंग गौड, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com