प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या अफवा सोशल मिडियावर व्हायरल; हे आहे सत्य

सकाळ
Tuesday, 14 January 2020

प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या संशयावरून मुंबई व ठाणे विभागात अंड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या गैरसमजुतीतून पोलिसांद्वारे रोखल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. अन्नपदार्थ गुणवत्ता नियंत्रकविषयक देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) या बाबत सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

पुणे : प्लॅस्टिकच्या अंड्यांबाबतचे वृत्त तथ्यहिन आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये एकही प्लॅस्टिकचे अंडे कोठे सापडलेले नाही. या बाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट निरर्थक आणि अशास्त्रीय असून नागरिकांनी त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटीचे (एनईसीसी) अध्यक्ष बी. व्ही. देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

Video : असे चित्र पाहून व्हाल थक्क; चित्रकाराचे वयं ऐकाल तर...
 

तथाकथित प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली पोल्ट्री उद्योग- व्यावसायिकांची अडवणूक होत असून त्या बाबत नेमकी वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणण्यासाठी 'एनईसीसी'चे देसाई, व्ही. एच. ग्रूपचे (वेंकीज)डॉ. प्रसन्न पेडगावकर तसेच डॉ. अजित रानडे, अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त एस. एस. देशमुख, 'एनईसीसी'चे सदस्य पी. के. भगत यांनी पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली.

तुम्हाला माहिती आहे कुठे मिळतो चायनीज मांजा? मग पोलिसांना सांगा कारण..

प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या संशयावरून मुंबई व ठाणे विभागात अंड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या गैरसमजुतीतून पोलिसांद्वारे रोखल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. अन्नपदार्थ गुणवत्ता नियंत्रकविषयक देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) या बाबत सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात 'प्लॅस्टिक अंडी हा निव्वळ अपप्रचार आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही' असे स्पष्ट केल्याची माहिती डॉ. रानडे यांनी दिली. अंड्यांविषयी सातत्याने होत असलेल्या दुष्पप्रचारामुळे खपावरही परिणाम झाला आहे. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून एकाही ठिकाणी प्लॅस्टिकचे अंडे सापडलेले नाही.

पुणे : तेलाचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही

जगातील सर्वात सुरक्षित आणि पोषणमूल्ययुक्त अंडी भारतात उत्पादित होतात. अमेरिकेसह सर्व विकसित देशांत जनुकिय बदल केलेले (जीएमओ) मका आणि सोयामिल हे पोल्ट्री खाद्यात वापरले जातात. भारतातील मका आणि सोयामिल हे नॉन जीएमओ प्रकारातील आहेत. जगभरात भारतीय अंडी ही नॉन जीएमओ खाद्य वापरून उत्पादित प्रकारात मोडतात. त्या आधारावर नियातीसाठीही विशेष मागणी असते, असे देसाई यांनी सांगितले.

पिंपरीत वाहनांची तोडफोड करुन टोळक्यांनी माजवली दहशत

भारतीय अंडी सुरक्षिततच.....

आत्तापर्यंत विविध राज्यांत तथाकथित व संशयित प्लॅस्टिक अंड्यांची चाचणी प्रयोगशाळांमध्ये झाली आहे. त्यात ही अंडी कोंबडीपासून निर्मित जैविक अंडी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय अंडी खाण्यास अत्यंत सुरक्षित आहेत. गैरसमजांमुळे अंडी उद्योगांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या रोजगाराव गदा येऊ शकते. तसेच ग्राहकही चांगल्या पोषणापासून वंचित राहू शकतो, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

निर्दयी! पुण्यात एक दिवसांच्या जुळ्यांना ऐन थंडीत फेकून दिले तलावाशेजारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truth of Plastic egg rumor viral on social media