पुणे जिल्ह्यातील भाजपच्या या आमदाराला कोरोना...नागरिकांना केले भावनिक आवाहन

rahul koo
rahul koo

केडगाव  (पुणे) : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॅाझीटिव्ह आल्याची माहिती  स्वतः त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. कुल त्यांच्या पुण्यातील घरी होम क्वारंटाइन झाले आहेत.

आमदार कुल हे आषाढी एकादशीच्या दिवशी ( ता. १ )  दौंड येथे गेले होते. तेथे त्यांनी दौंड शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. तेव्हा तेथे एका ज्येष्ठ पदाधिका-यास खोकला येत होता. दरम्यान, आमदार शुक्रवारी (ता. ३) दिल्लीला गेले. त्यावेळी शनिवारी त्यांना समजले की, त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही त्यांनी खबरदारी म्हणून ४,५, ६ जुलै दरम्यान स्वतःला पुण्यात क्वारंटाइन केले. त्यानंतर त्यांनी काल स्वतःची कोरोना चाचणी केली. कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॅाझीटिव्ह आला आहे. 

त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरातील सर्व जण, त्यांचे स्वीय सहायक, चालक अशा आठ जणांची कोरोना चाचणी काल केली. आमदार कुल वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या कुल यांचे कुटुंबिय त्यांच्या राहू या गावी आहे. तर, कुल हे पुण्यात होम क्वारंटाइन झाले असून, ते घरीच सर्व उपचार घेणार आहेत. त्यांनी त्यांच्याजवळील स्वीय सहायक, चालक या सर्वांना घरी पाठवून गेले दिले आहे.

दरम्यान, आमदार कुल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी सोशल मीडियावर फिरत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहू गावात पुढील आठ दिवसांसाठी जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे. आमदार कुल यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. कुल यांच्या कोरोना अहवालाबाबत अद्याप आम्हाला माहिती मिळाली नसल्याचे दौंडमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कुल यांनी सोशल मीडियावर दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, एकमेकांच्या साथीने आपल्याला लढायचं आहे. कोरोनाला हरवायचे आहे. लोकांच्या समस्या सोडवताना अनेकांशी संपर्क येत होता. खबरदारी घेतली तरी संसर्गाचा धोका होताच. कोरोनामुळे विलगीकरणात असलो, तरी दैनंदिन कामकाज चालू राहिल.  नागरिकांच्या समस्यांसाठी त्यांनी माझ्या कार्यालयाच्या ७०३८६ ६७७९९ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com