मुंबईहून आंबेगाव तालुक्यात 'ते' आले कोरोना घेऊन...

corona logo1.jpg
corona logo1.jpg

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात निरगुडसर येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला रुग्ण आढळून आला आहे. तसेच शिनोलीच्या अजून एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. साकोरे गावात पहिला रुग्ण आढळून आला. तसेच जवळे गावात १ कोरोना बाधित आढळून आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची संख्या एकूण पाच झाली आहे.

विशेष म्हणजे पाचही रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. मुंबईमध्ये विक्रोळी व घाटकोपर येथे सर्वजण राहत होते. मुंबईचे कनेक्शन आंबेगावकराना महागात पडले आहे. अजून वीस जणांचा प्रयोग शाळेतील तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे प्रशासन व तालुक्यातील १०४ गावातील गावकरी चिंतेत आहेत.

निरगुडसर येथे आढळून आलेला रुग्ण पोलीस खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पुतणीच्या लग्नानिमित्त ते घाटकोपरहून कुटुंबियासह गावी आले होते. हळदीच्या कार्यक्रमात सार्वजण एकत्र होते. या घटनेमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलेली आहे. रविवारी (ता. २४) दुपारी संबधित व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती समजल्यानंतर राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी हळदी समारंभाला हजर असलेल्या ६१ जणांना होम क्वारंटाइन करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जातील. आंबेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी निरगुडसर येथे भेट दिली.

गावाच्या सीमा सील केल्या आहेत. संपूर्ण गाव लॉकडाउन केले आहे. गावात आरोग्य विषयी जनजागृती सुरु झाली आहे. साकोरे येथील रुग्ण भाजीपाला विक्रेता तर शिनोलीचा रुग्ण ड्रायव्हर आहे. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी चाळीत राहत असल्यामुळे सार्वजनिक शौचालयाचा त्यांना वापर करावा लागत होता. साकोरे येथे आलेला रुग्ण विक्रोळीत सासुरवाडीत राहत होता. तेथे त्याच्या ड्रायव्हर असलेल्या मेहुण्याचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे धावपळ करून सासू, सासरे व दोन नातींना कवठे यमाई येथे सोडून पत्नीसह ते साकोरे गावात आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींना मंचर जवळ असलेल्या भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन केले आहे

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

शिनोली येथे आलेला रुग्ण कॅब चालक आहे. पण लॉकडाउनमुळे दोन महिने कॅब बंद होती. त्यांच्या चाळीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चालक गावी आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींना भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन केले आहे. तसेच जवळे गावात सापडलेला कोरोना बाधित रुग्ण हा मुंबईतील चेंबूर येथून आला आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण मुंबईहून आले आहेत. ते जर गावी आले नसते तर या महाभयंकर आजारापासून आंबेगाव तालुका अलिप्त राहिला असता अशी चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com