

Omraje Nimbalkar latest news pune
esakal
Omraje Nimbalkar viral photo : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी पक्षातील सहा फुटीर खासदारांच्या भूमिकेमुळे मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या खासदारांनी संसदेत स्वतंत्र गटाची स्थापना केल्याची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला या खासदारांनी दांडी मारली. बैठकीनंतर संबंधित सर्व सहा खासदार संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.