हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील निम्म्याच कर्मचाऱ्यांना लस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

पुणे महापालिकेने शहरात विविध 16 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, राज्य सरकारने केवळ आठ ठिकाणी लसीकरणास परवानगी दिली.

पुणे - कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या पुण्यातील 60 हजारांपैकी फक्त 30 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनाच प्रतिबंधक लस घेता येणार आहे. राज्यालाच लशीचा पुरवठा कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यावरही झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. 

पुणे महापालिकेने शहरात विविध 16 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, राज्य सरकारने केवळ आठ ठिकाणी लसीकरणास परवानगी दिली. तसेच, महापालिकेने मागणी केलेल्या संख्येपेक्षा निम्म्याच लशीचे डोस मिळाले आहेत. शनिवार (ता. 16) पासून शहरात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्याचदिवशी आरोग्य सेवेतील 800 कर्मचाऱ्यांनाच लस देणार आहे. 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

लसीकरणासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. प्रत्येक बूथवर एक लसीकरण कर्मचारी, दोन पर्यवेक्षक आणि एक सुरक्षारक्षकाची टीम असणार आहे. पोर्टलवर नाव व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांना लसीकरणाची तारीख व वेळेचा एसएमएस येणार आहे. 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी अशा 16 रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला पाठवला होता. शहरातील 60 हजार सेवकांना लस दिली जाणार आहे. यामध्ये 11 हजार 74 सरकारी सेवक असून 41 हजार 628 खासगी आरोग्य सेवक आहेत. शहरामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी एक लाख 15 हजार 825 इतके डोस लागणार आहेत. मात्र, राज्य सरकारने शहरातील आठ रुग्णालयांमध्ये लसीकरणास परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्येक सेंटरवर 100 या प्रमाणे एका दिवसात 800 कर्मचाऱ्यांना लस देणार आहे. त्या कर्मचाऱ्यांचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर पुढील लसीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्य सरकारने बुधवारी सकाळी महापालिकेकडे 60 हजार लस पाठवल्या. त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्या आहेत. त्यापैकी काही लसीचे डोस शहरातील केंद्रीय दवाखान्यांना दिले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. 

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

या रुग्णालयांत होणार लसीकरण 
1) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा 
2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ 
3) ससून रुग्णालय, पुणे स्टेशन 
4) सुतार दवाखाना, कोथरूड 
5) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा 
6) रूबी हॉल क्‍लिनिक, ताडीवाला रस्ता 
7) नोबल हॉस्पिटल, हडपसर 
8) भारती हॉस्पिटल, धनकवडी 

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 30000 health workers in Pune will be able to get the vaccine