अमरावतीची संत्री दुबईला रवाना

The oranges of Amravati were exported to Dubai through the Agriculture Board and APEDA.jpg
The oranges of Amravati were exported to Dubai through the Agriculture Board and APEDA.jpg

मार्केट यार्ड(पुणे) : राज्यातील अमरावती जिल्ह्यातील संत्रा कृषीपणन मंडळ आणि अपेडा यांच्या माध्यमातून दुबईला निर्यात करण्यात आली. गुरवारी (ता.१३) एकूण १५ टन संत्रा निर्यात करण्यात आली. महाराष्ट्रातून द्राक्ष आणि आंबा या दोन फळांची निर्यात होते. परंतु त्यापलिकडे जाऊन संत्री उत्पादकांनी दुबईला संत्री निर्यात केली.

डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत
संत्रा निर्यातीचा कटेनर रवाना करते वळी अपेडा चे सहा. सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पटिल, हॉर्टीकलचर डेव्हलपमेंट ऑफिसर अभिमन्यू माने, तसेच कृषि व्यवसाय पणन तज्ञ जंगम तुषार, नितिन मेरे, संजय गुरव, दुबई येथील आयातदार अलताफ हुसेन, रियास तसेच निर्यातदार सोनल लोहारीकर आणि कृषि पणन मंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

कृषि पणन मंडळाच्या वाशी, नवी मंबई येथील पॅक हाऊस मध्ये संत्र्याची प्रथम प्रतवारी करुन संत्रा पाण्याने स्वच्छ करुन त्यावर वॅक्सींग प्रक्रिया केली. त्यानंतरच दुबई येथे एस.डी.एफ. प्रोडकशन प्रा. लि. कंपनी मार्फत निर्यात  करण्यात आली. यावेळी संत्रा बॉक्स पॅकींग न करता प्रथमच 10 किलोच्या क्रेटस मध्ये टाकून रेफर कंटेनरने निर्यात केला आहे. हा कंटेनर 19 फेब्रुवारीला दुबई येथे पोहचून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

राज्यामध्ये अमरावती आणि नागपुर जिल्ह्यात संत्र्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. यंदा पणन मंडळाने संत्र्याच्या निर्यातीमधील अडचणी लक्षात घेतल्या. त्यानुसार संत्रा वॅक्सींग करुन निर्यात होण्यासाठी प्रयास सुरु केले. त्याचाच एक भाग म्हणुन राज्यातुन संत्रा प्रथमच वॅक्सींग करुन निर्यात करण्यात आली.

मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस

यंदा 40 कंटेनर निर्यातीचे नियोजन
संत्रा निर्यातीची संपुर्ण प्रक्रिया कृषि पणन मंडळ आणि अपेडा यांच्या तांत्रीक मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही निर्यात यशस्वी झाल्यास या हंगामात सुमारे 40 कंटेनर निर्यातीचे नियोजन निर्यादार आणि कृषि पणन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com