गुण आला नाही पैसे परत द्या; मित्राच्या मदतीनं रुग्णाची डॉक्टराला मारहाण

the patient beats the doctor with a stick With the help of Friends in pune.jpg
the patient beats the doctor with a stick With the help of Friends in pune.jpg

पुणे : योग्य उपचार न केल्याचा आरोप करीत रुग्णाने औषधोपचारांचे पैसे परत देण्याची मागणी डॉक्‍टरकडे केली. मात्र पैसे देण्यास नकार दिला म्हणून रुग्णाने साथीदारांच्या मदतीने डॉक्‍टरलाच काठीने मारहाण केल्याची घटना घडली. डॉक्‍टरला मारहाण केल्यानंतर आरोपींनी क्‍लिनिक आणि कारचीही तोडफोड केली आहे.

हेही वाचा - ...आता मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग झाला मोकळा

हा सर्व प्रकार खडकीतील नवा बाजार परिसरात बुधवारी (ता. 13) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सचिन नावाचा रुग्ण व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रितेश कीर्तिकुमार शहा (वय 45, रा.खडकी) यांना आरोपींनी मारहाण केली. त्याबाबत डॉ. शहा यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. शहा हे त्वचा रोग तज्ज्ञ आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शहा यांनी आरोपी सचिन याच्या लघवीच्या जागेवर उपचार केले होते. मात्र औषधोपचार केल्यानंतरही आजार पूर्णतः बरा झाला नसल्याचे रुग्णाचे म्हणणे होते. त्यामुळे उपचारासाठी खर्च केलेले पैसे परत करण्याची मागणी त्याने फिर्यादी यांच्याकडे केली होती. मात्र पैसे परत देण्यास डॉ. शहा यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने साथीदारांसह क्‍लिनिकमध्ये घुसून फिर्यादींना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. त्यानंतर क्‍लिनिकची तोडफोड करून कारच्या काचा फोडल्या. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल पाटील करीत आहेत.

फिर्यादी यांना आरोपींची पूर्ण नावे माहिती नाहीत. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com