

पुणे : पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा कोरोनामुळे करता आलेली नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाऊनच्या काळात सलग पाच महिन्यांपासून अधिक काळ चोख कर्तव्य बजावत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणार्या महाराष्ट्रातील पोलीस अधिकार्यांचा सन्मान व कर्तव्य बजावताना कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पोलिस व पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा उपक्रमात देशमुख बोलत होते. या वेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, संकल्प ह्युमन रिसोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन, पुणेचे संस्थापक-संचालक डॉ. पी. एन. कदम, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे निमंत्रक किरण जोशी, राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे अध्यक्ष नितीन बिबवे व्यासपीठावर होते.
या वेळी डॉ. के. व्यंकटेशम (पोलीस आयुक्त, पुणे), डॉ.अभिनव देशमुख (जिल्हा पोलीस प्रमुख, पुणे), तेजस्वी सातपुते (जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा), स्वप्ना गोरे (पोलीस उपायुक्त, पुणे), विजय चौधरी (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे), निलेशकुमार महाडिक (पोलीस उपनिरीक्षक, खंडणी व अंमलीपदार्थ विरोधी पथक, पुणे), तानाजी सावंत (पोलीस निरीक्षक, एलसीबी, कोल्हापूर), प्रसाद लोणारे (सहायक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, हडपसर, पुणे), सुभाष शिंदे (पोलीस नाईक, विरार, मुंबई), राजेंद्र मायने (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भिवंडी), अशोक येवले (वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे), विजयानंद पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोलापूर) तसेच पुरुषोत्तम लोहिया, डॉ. बी. टी. जमादार (जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर), अंजली हडवळे (समुपदेशिका, मुंबई), मंजितसिंग विर्दी (मंजितसिंग विर्दी फाउंडेशन), सन्मित शहा (सीईओ, प्रॅक्टिकल एज्युस्किल), अजय कडू (सोलापूर) डॉ. सुजित निलेगावकर, रमेश रमणजी (सीईओ, आयएएचव्ही), सुनील दरेकर (कोवीड केअर सेंटर, महापालिका) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राज्यातील पोलीस भरती जाहीर; भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार याबाबत उमेदवार संभ्रमात
कर्तव्य बजावताना कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पोलिस आणि पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व महाएनजीओ फेडरेशनने उचलले आहे. मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. संकल्प ह्युमन रिसोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पोलीस कर्मचार्यांना प्रातिनिधीक स्वरूपात आरोग्य कीटचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक उपक्रम राबवित आला आहे. भविष्यातील उपक्रमांसाठी गृहमंत्री देशमुख यांनी या वेळी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांदंर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात कंगनाचा उल्लेख टाळून ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम ज्या व्यक्तिने केले आहे तिला राजकीय फायद्यासाठी संरक्षण दिले जात आहे. तसेच या प्रकरणाला खतपाणी घातले जात आहे, याचा विचार समाजाने केला पाहिजे.
राजीव खांडेकर म्हणाले, कोरोनामुळे बेफिकीर आणि घाबरलेला अशा दोन गटात समाज विभागला गेलेला आहे. शहाणपणाचे डोस पाजणारा असाही एक गट आहे. परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे सध्याच्या काळात दिसून येत आहे. पोलीस, पुढारी आणि पत्रकार यांच्याबाबत समाजाला आदरभाव राहिलेला नाही. या काळात अपुर्या सोयी-सुविधा असतानाही पोलिसांनी जे काम केले त्याचे खरोखरच कौतुक आहे. संकट काळात सरकारकडून मोठमोठ्या घोषणा होतात पण मदत काही वेळेत पोचत नाही. घोषणा केल्यानंतर निदान आठ दिवसात पिडितांना मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कंगनाप्रकरणाला राजकीय व्यक्तिंनी विनाकारण महत्त्व दिले असेही त्यांनी नमुद केले.
एका रात्रीत तीन वेगवेगळ्या अपघातात आठ जणांचा मृत्यू; कोठे ते वाचा
डॉ. योगेश जाधव म्हणाले, कोरोनामुळे सर्वांचे जीवन पूर्णत: बदलून गेले आहे. प्रत्येक क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ही लढाई किती दिवस चालणार आहे याचे कोणालाच काही आकलन होत नाहीये. याही परिस्थितीत नेटाने आपले कर्तव्य बजावणार्या सर्व क्षेत्रातील व्यक्तिंना मानाचा मुजरा करून पोलिसांप्रमाणेच पत्रकारांनाही विमा कवच मिळावे, अशी अपेक्षा योगेश जाधव यांनी व्यक्त केली.
डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, करोनो काळात सुरक्षा, आरोग्य, सफाई कर्मचारी आदींनी कर्तव्य भावनेतून सेवा बजावली आहे. पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत. पत्रकारांकडून अनेक उपयुक्त गोष्टी समजल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कौतुकामुळे पुन्हा कामाला प्रेरणा मिळते अशा शब्दात स्वप्ना गोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त केल्या.
डॉ. पी. एन. कदम म्हणाले, कोरोनाने शारीरिक मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. या काळात आहार, विहार आणि विचार या माध्यमातून कोरोनारूपी संकटाला कसे सामोरे जावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
पुण्यात कोरोनाचा थरार कायम; रुग्णसंख्येने ओलांडला अडीच लाखांचा आकडा
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भूमिका विषद करताना राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले, कर्तव्यभावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांनी समाज आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम केले पाहिजे. सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाने योगदान द्यावे, आणि आरोग्यसंपन्न समाज घडवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
निमंत्रक किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस देखील माणूस आहेत ही कविता सादर करून करण्यात आली. कोरोनामुळे निधन पावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांना सुरुवातीस श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप चव्हाण यांनी केले, तर आभार अजित घस्ते यांनी मानले.
शाळा प्रवेशाचे वय कमी करण्याचा निर्णय चिंता वाढविणारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.