
पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने राजगुरूनगर बस स्थानकाच्या आवारात, दोघा संशयितांकडून ४ पिस्तूले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.
राजगुरूनगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने राजगुरूनगर बस स्थानकाच्या आवारात, दोघा संशयितांकडून ४ पिस्तूले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.
आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
दरम्यान, शस्त्रसाठा बाळगणाऱ्या त्या दोघांना अटक करण्यात आली असून, प्रवीण ऊर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय २८, रा. वाळद, ता. खेड) आणि निलेश ऊर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय २४, रा. वांझरवाडी, ता. दौंड) अशी त्यांची नावे आहेत. यातील वाव्हळ हा येथील कुख्यात गुंड महेश भागवत खून खटल्यातील आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलिस दलाला सज्ज राहण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड तालुक्यात गस्त घालीत होते. तेव्हा त्यांना राजगुरुनगर बस स्थानकाजवळ, अवैध पिस्तूल विक्रीसाठी संशयित येणार असल्याची माहिती मिळाली.
पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?
त्यानुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी बस स्थानकावर पोहचले. तेथे तयांना संशयास्पदपणे वावरणारे दोघेजण आढळले. त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता दोघांच्या कमरेला, प्रत्येकी २ मिळून, एकूण ४ देशी बनावटीचे पिस्तूल व त्यामध्ये प्रत्येकी २ मिळून, एकूण ८ काडतुसे सापडली. दोघांनाही अटक करुन, खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
(संपादन : सागर डी. शेलार)