दापोडीतील शाळा परिसरात पोलिसांची रोडरोमियोंवर धडक कारवाई

रमेश मोरे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळेत नववी व दहावीच्या मुलींसाठी मार्गदर्शनपर उद्बोधन वर्ग घेवून सुरक्षाविषय घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबर शाळा परिसरात पोलिसांकडून  नियमित गस्त वाढवण्यात आल्याने पालक, शिक्षक, विद्यार्थींनीमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जुनी सांगवी : दापोडी येथील शाळा परिसरात शाळकरी मुलींना छेडछाडीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मुली, पालक, शिक्षकांमधून याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. परिसरात टवाळखोर रोडरोमियोंचा त्रास वाढत गेल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत रस्त्यावरून येताजाता मुलींना छेडछाड, अश्लील शेरेबाजी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुरूवार (ता.६) भोसरी पोलिसांकडून शाळा परिसरातील अशा टवाळखोर रोडरोमियोंवर धडक कारवाई करत चोप देण्यात आला.

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

याचबरोबर येथील जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळेत नववी व दहावीच्या मुलींसाठी मार्गदर्शनपर उद्बोधन वर्ग घेवून सुरक्षाविषय घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबर शाळा परिसरात पोलिसांकडून  नियमित गस्त वाढवण्यात आल्याने पालक, शिक्षक, विद्यार्थींनीमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे- दौंड लोहमार्गाचे चौपदरीकरण होणार कधी?

यावेळी प्राचार्य राम गोन्टे, उपप्राचार्या अंजली घोडके, पर्यवेक्षक व जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे,विश्वास जाधव,शिवसेना पदाधिकारी प्रमोद गायकवाड व राहुल जाधव हे ही उपस्थितीत होते.  भोसरी पोलिस ठाण्याचे निरिक्षक शंकर अवताडे उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलिस निरिक्षक शंकर अवताडे म्हणाले, ''अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुलींनीही काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी आपले पालक, शिक्षक यांना स्वताला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली पाहिजे.

निगडीत तरूणांवर कोयत्याने वार करुन केली घरांची तोडफोड: चौघांवर गुन्हा दाखल

शिक्षक, पालकांनी पुढाकार घेवून एकत्रित पोलिस प्रशासनाला माहिती कळवणे गरजेचे आहे. याचबरोबर मुलींनीही आवश्यक खबरदारी घेवून शाळा व परिसराबाहेर वावरताना दक्ष राहायला हवे. या उद्बोधन वर्गात नववी व दहावीच्या एकूण अडीचशे मुली उपस्थित होत्या.

तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take action on road romio on school area at Dapodi