कर्जवसुलीसाठीची दादगिरी थांबणार, फायनान्स कंपन्यांना पोलिसांचा इशारा

मिलिंद संगई
Friday, 3 July 2020

काही फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिका-यांकडून दमदाटी करून वसुलीचे प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या

बारामती (पुणे) : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार मार्च ते ऑगस्ट 2020 पर्यंत कर्जवसुलीस स्थगिती आहे. त्यामुळे या काळातील कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिका-यांनी दादागिरी केली, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुबंर पाटील यांनी दिला आहे. 

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

बारामती शहर पोलिस ठाण्यात काल विविध फायनान्स कंपन्यांच्या अधिका-यांची बैठक झाली. यात शिरगावकर यांच्यासह पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील हेही उपस्थित होते.  लॉकडाउनमुळे अनेकांचे उत्पन्नच थंडावल्याने कर्जाचे हप्ते भरणे अनेकांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीत काही फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिका-यांकडून दमदाटी करून वसुलीचे प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यात बजाज फायनान्सच्या दोन कर्मचा-यांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले. 

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

या बैठकीत रिझर्व्ह बँकेने जे निर्देश दिलेले आहेत, त्यांचे पालन व्हायला हवे, फेब्रुवारी 2020 पर्यंतची कर्जाची बाकी वसूल करताना महिलांशी सौजन्याने वागावे, वसुलीसाठी जाताना ओळखपत्र जवळ गरजेचे आहे, सर्व कायदेशीर बाबींचीही पूर्तता करणे गरजेचे आहे, असे शिरगावकर व पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव

वसूली करताना कायद्याचे उल्लंघन करू नये, ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू फायनान्स कंपनीने जबरदस्तीने हिसकावून नेऊ नयेत, महिलांशी सौजन्याने बोलले पाहिजे, वेळी अवेळी जाऊन लोकांना त्रास देऊ नये, वसूली प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होता कामा नये, अशा सूचना फायनान्स कंपनीला देण्यात आल्या. 

हवेलीतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पोचला...

या प्रकरणी राजे ग्रुपचे गणेश कदम, अॅड. भार्गव पाटसकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची पोलिसांनी दखल घेत फायनान्स कंपनीच्या अधिका-यांना बैठक घेत इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police warns finance companies to sue for debt recovery