esakal | Coronavirus : आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दीडशेहून अधिकांचा कोरोनाने घेतला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus-Death

सिंगापूर, लंडन आणि मलेशियाहून 10 मे रोजी एकूण 141 व्यक्तीचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

Coronavirus : आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दीडशेहून अधिकांचा कोरोनाने घेतला बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 926 झाली आहे. 1 हजार 139 कोरोना बाधीत  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधीत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 107 रुग्ण गंभीर आहेत.

तसेच, परप्रांतीय मजुरांसाठी दिवसभरात दहा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 इतकी झाली आहे. विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधीत 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना गंडविले; मोफत प्रवासाचा दिलासा नाहीच

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण :  
सिंगापूर, लंडन आणि मलेशियाहून 10 मे रोजी एकूण 141 व्यक्तीचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

- पायी गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना शेतकऱ्याने दिले २ टन टरबूज

मजुरांसाठी रिलीफ कॅम्प :‍ 
पुणे विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 136, कामगार विभागामार्फत 68 व साखर कारखान्यामार्फत 18 असे एकुण 222 रिलीफ कॅम्प स्थलांतरीत मजुरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये 19 हजार 682 स्थलांतरीत मजूर असून, 90 हजार 668 मजुरांना भोजन देण्यात येत आहे.

- वारकरी बांधवांनो, यंदा 'अशी' करा विठ्ठलाची वारी

परप्रांतीयांसाठी दिवसभरात दहा रेल्वेगाड्या
11 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी 4, उत्तरप्रदेशासाठी 2, उत्तराखंड आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी एक अशा आठ रेल्वे रवाना झालेल्या आहेत. तसेच, सायंकाळी जबलपूर (मध्य प्रदेश) आणि जयपूर (राजस्थान) येथे प्रत्येकी एक रेल्वेगाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा