'लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या कामगारांनो...!'; जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाकडे करू नका दुर्लक्ष!

Migrant_Workers
Migrant_Workers
Updated on

पुणे : लॉकडाऊनमुळे राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

सद्यस्थितीत कोणत्याही बसेस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार आणि नागरिकांनी अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे. जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची प्रशासनाच्या वतीने माहिती घेऊन स्थलांतरणासाठी यादी तयार करण्यात येणार आहे.

हे कामगार ज्या राज्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्या राज्याशी राज्य सरकारमार्फत संपर्क साधून त्यांना संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतराची कार्यवाही सुरु केली जाईल. 

कामगारांच्या तक्रारींच्या निवारणासाठी 24 तास नियंत्रण कक्ष
दूरध्वनी क्रमांक : 
020-26111061  020-26123371 
किंवा टोल फ्री क्रमांक 1077  dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com  
या इ-मेलवर तक्रारी स्विकारल्या जातील.

सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच स्थलांतर (अशी असेल प्रक्रिया) : 

 - जिल्ह्यात तलाठी, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांमार्फत व्यक्तींची यादी तयार करून त्या-त्या राज्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरु 
-  कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची परवानगी 
- वाहनांची व्यवस्था स्वत: करावी लागेल
-  प्रवासासाठी वाहनांचा निश्चित मार्ग व कालावधी असलेला ट्रान्झीट पास सोबत ठेवणे आवश्यक.

- पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

-  वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. वाहनात सोशल डिस्टन्सिंग आवश्यक
- महाराष्ट्र राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त समन्वय ठेवून निर्णय घेतील.
 - प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून 14 दिवस घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com