पुणे-महाबळेश्वर चला आता सुसाट

पुणे-महाबळेश्वर चला आता सुसाट

कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरूर मार्गाचे होणार रुंदीकरण
भोर - कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरूर या राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारकडून ३८८ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळाली आहे. पुढील आर्थिक वर्षातील निधीच्या तरतुदीनुसार या कामाला सुरुवात होणार आहे. पुण्याहून भोर-मांढरदेवी-वाईमार्गे पाचगणी-महाबळेश्वरला आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी या मार्गाचा खूप उपयोग होणार आहे. राज्य महामार्ग यवत-माळशिरस-सासवड-कापूरव्होळ-भोर-मांढरदेव-वाई-सुरूर (एसएच ११९) या महामार्गांत या कापूरव्होळ-भोर-वाई-सुरूर या मार्गाचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरूर हा मार्ग दीड लेनचा म्हणजे साडेपाच मीटर रुंदीचा आहे. रुंदीकरणानंतर हा १३ मीटर रुंदीचा होणार आहे. यामध्ये १० मीटरचा डांबरी रस्ता आणि ३ मीटरच्या साइडपट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे. भोर शहराच्या आणि वाई (जि. सातारा) शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या या मार्गाची रुंदी १२ मीटरची राहणार आहे. भोर-मांढरदेवी टप्प्यातील अंबाडखिंड घाटातील रस्ताही रुंद होणार असल्यामुळे या घाटातील अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. भोर-वाई-पाचगणी-महाबळेश्वरमार्गे कोकणात जाणाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे.

याशिवाय, हा मार्ग वाईवरून सुरूर येथे पुणे-सातारा महामार्गास मिळत असल्यामुळे खंडाळा येथील खंबाटकी घाटातील रस्त्यास हा मार्ग समांतर राहणार आहे. त्यामुळे नवीन मार्गावर पर्यटकांची नेहमी वर्दळ राहणार आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी पाठपुरावा केल्यामुळे राज्य सरकारने या ५८.८ किलोमीटरच्या अंतरासाठी ३८८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सरकारकडून अर्थसंकल्पात प्रत्यक्षात किती आणि कसा निधी मिळेल. त्यानंतर या मार्गाच्या कामाचा कालावधी निश्‍चित होईल. परंतु, तोपर्यंत तरी वाहनचालक व पर्यटकांना अडथळ्यांचा सामना करावाच लागणार आहे. 

एशियन बॅंक विकास योजनेअंतर्गत कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरूर या मार्गाचे काम प्रस्तावित केले आहे. विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत या मंजूर कामास निधी मिळणार आहे.
- संग्राम थोपटे, आमदार भोर

असा आहे प्रकल्प

  • सध्या या मार्गाच्या प्रकल्प आराखड्याचे काम सुरू 
  • आगामी अर्थसंकल्पात या रस्त्याच्या कामास निधी मिळणार 
  • त्यानंतर कामाला सुरुवात होणार
  • निधीच्या तरतुदीनुसार कापूरव्होळ ते भोर, भोर ते मांढरदेवी, मांढरदेवी ते वाई, वाई ते सुरूर अशा प्रकारचे कामाचे टप्पे राहणार 
  • कापूरव्होळ ते भोर या १५ किलोमीटरच्या अंतरासाठी ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागतो
  • रुंदीकरणानंतर हा वेळ केवळ १० ते १५ मिनिटे होणार 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com