कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची कोळोलीत आत्महत्या

चिंतामणी क्षीरसागर
सोमवार, 10 जुलै 2017

शेतीतून मिळणाऱ्या पैशांतून वेळेवर परतफेड करताना हातघाईला आल्याने अनेक दिवसांपासून ते निराश होते.

वडगाव निंबाळकर : कोळोली येथील किसन नारायण जाधव (वय 59) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून नैराश्‍येपोटी रविवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती तालुक्‍यातील सुपेनजीक नारोळी गावाच्या हद्दीत ही घटना घडली. त्यांचा भाऊ फक्कड जाधव यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

कर्जापायी कंटाळलेल्या शेतकऱ्याची गेल्या सहा महिन्यांतील तालुक्‍यातील ही पाचवी आत्महत्या आहे. किसन जाधव यांची सुमारे साडेचार एकर जमीन आहे. यातील दोन एकर जमीन आठमाही पिकते, तर इतर कोरडवाहू आहे. यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोसायटीचे कर्ज आहे. याशिवाय शेतीकामासाठी लोकांकडून हातउसने पैसेही त्यांनी घेतले होते.

शेतीतून मिळणाऱ्या पैशांतून वेळेवर परतफेड करताना हातघाईला आल्याने अनेक दिवसांपासून ते निराश होते. त्यांनी नैराश्‍येपोटी आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. शनिवारी (ता. 8) रात्री देऊळगाव रसाळ येथे जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले होते. सहायक फौजदार के. बी. मोरे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: pune news baramati news loan ridden farmer commits suicide