कचरा प्रकल्प रद्द करा; सरकारला जोडो मारो आंदोलन

संदीप जगदाळे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

हडपसर (पुणे): रामटेकडी औदयोगिक वसाहतीतील प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर प्रभागसमिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेविका वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नंदा लोणकर, नगरसेविका रूक्‍साना इनामदार, अशोक कांबळे, निलेश बनकर, सागरराजे भोसले, कलेश्वर घुले, मंदार घुले, अविनाश काळे, अशोक कांबळे, प्रवीण तातोड, अक्षय रायकर, विशाल कुदळे, डॉ.

हडपसर (पुणे): रामटेकडी औदयोगिक वसाहतीतील प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर प्रभागसमिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेविका वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नंदा लोणकर, नगरसेविका रूक्‍साना इनामदार, अशोक कांबळे, निलेश बनकर, सागरराजे भोसले, कलेश्वर घुले, मंदार घुले, अविनाश काळे, अशोक कांबळे, प्रवीण तातोड, अक्षय रायकर, विशाल कुदळे, डॉ. किशोर शहाणे, योगश हिंगणे, सतिश हिंगणे, विक्रम जाधव, अविनाश काळे यांसह मोठया ख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

ससाणे म्हणाले, 'कचरा प्रकल्पाचे काम बंद करा यासाठी सनदशीर मार्गाने महापौर व आयुक्त, पालकमंत्री आणि मुख्यंत्र्यांना गेली चार महिने लेखी, तोंडी विनंती करुन आणि आंदोलन करून विनंती केली. बहि-या प्रशासनला व सत्ताधारी भाजप सरकारला आंदोलकांचा आवाज ऐकू येत नाही. त्यांची कानउघडणी करण्यासाठी आम्ही सलग आठ दिवस आंदोलन केले. लाथो के भूत बातोंसे नही मानते, म्हणूनच आम्ही भाजप सरकारला जोडे मारले. आता जर सत्ताधा-यांना जाग येणार नसेल तर पुढच्या काळात घनकचरा विभागाच्या गाडया आडवून फोडल्या जातील. सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने येथे कोणत्याही परिस्थीतीत कचरा प्रकल्प आम्ही होवू देणार नाही. यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची नागरिकाची भूमीका आहे.'

सलग आठ दिवस केलेल्या या आंदोलनात भोंगा वाजवणे, तोंडावर काळी पट्टी बांधणे, भजन, थाळी वादन, जागरण-गोंधळ, कचरा तुला पुढील दोन दिवसात कचरा तुला व जोडो मारो आंदोलने करण्यात येणार आहे. अगोदरच या भागात चार कचरा प्रकल्प आहेत. त्यामुळे शहराचा कचरा आमच्या माथी मारू नका, असा असंतोष नागरिकांमध्ये आहे. हडपसरची कचरा पेटी होवू देणार नाही, या भावनेने हडपसर वासीयांमध्ये सत्ताधा-या विरोधात तिव्र संताप पसरला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news hadapsar cancel the garbage project