'इंदू सरकार'वरून पुण्यात काँग्रेसने केली मधुर भांडारकरांची नाकाबंदी (व्हिडिओ)

अश्विनी जाधव-केदारी
शनिवार, 15 जुलै 2017

  • मधुर भंडारकर सोबत चर्चेची मागणी
  • काँग्रेस कार्यकर्ते होटल क्राउन प्लाझा ला जमलेले आहेत
  • पुण्यात होणारी मधुर भंडारकरची पत्रकार परिषद झाली रद्द

पुणेः इंदू सरकार या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित आगामी चित्रपटावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पुणे पोलील आज (शनिवार) आमने-सामने आले. चित्रपटाचे निर्माते - दिग्दर्शक मधुर भांडारकर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आले असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून निदर्शने केली. 

भांडारकर यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते विरोध तीव्र करु शकतात हे लक्षात आल्यामुळे पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतर भांडारकर बावधनमधील सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. मात्र, त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधुर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवलील क्राउन प्लाझा या हॉटेलवर पोहचले. या हॉटेलमधे तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, त्या आधीच माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते क्राउन प्लाझा हॉटेलमधे घुसले. त्यामुळे ही पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.

काँग्रेसचे कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर बसून घोषणाबाजी करीत आहेत. 

मधुर भांडारकर हे सध्या क्राउन प्लाझा हॉटेलमधील त्यांच्या रुममधे आहेत. आज संध्याकाळी सातच्या सुमारास ते विमानानी मुंबईला जाणार आहेत. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते हॉटेलची लाॅबी, पार्किंग आणि विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बसून आहेत. हॉटेल क्राउन प्लाझा आणि विमानतळावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pune news madhu bhandarkar indu sarkar movie and congress