सासवडला रिपब्लिकनकडून तासभर रास्ता रोको

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

सासवड (पुणे): सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले ते पुन्हा या विभागाकडे वर्ग करा.. या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गटाच्या) वतीने आज सासवड (ता. पुरंदर) येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या विरोधात रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.

सासवड (पुणे): सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले ते पुन्हा या विभागाकडे वर्ग करा.. या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गटाच्या) वतीने आज सासवड (ता. पुरंदर) येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या विरोधात रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.

पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) कार्याध्यक्ष पंकज धिवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सासवड शहरात पोलीस ठाण्यापासून जवळच सासवड-जेजूरी मार्गावर झाले. यावेळी सचिव संदिप बनसोडे, दादा गायकवाड, जयपाल यादव, अमोल साबळे, स्वप्नील कांबळे, अमोल खरात, अजय धिवार, किरण धायगुडे, राहुल काळे, सुरज काकडे, महादू भोंडे, सुनिता कसबे, पल्लवी भोसले, पंढरीनाथ लोंढे, मयूर बेंगळे, दिपक वाघमारे आदी मान्यवर व कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

यावेळी पंकज धिवार यांनी प्रमुख भाषणात सांगितले की, शेतकरी कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पण सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले. ते शासनाने अन्य निधीतून द्यावेत. तसेच आमचा सामाजिक न्याय विभागाचा हा निधी पुन्हा या विभागाकडे वर्ग करावा. तसेच मागासवर्गीयांची बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, जेजुरी येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवतीची परमिटरुम बंद करा, डॉ. बाबासाहेबांच्या जेजुरीतील अस्थिस्मारकास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा. सामाजिक व धार्मिक, जातीय अन्याय दूर व्हावेत, आदी मागण्या आहेत. त्या पूर्ण न केल्यास पुन्हा जनआंलोदन केले जाईल.

यावेळी तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन पंकज धिवार यांच्याकडून स्विकारले. तसेच शासनाला तुमच्या भावना कळविण्याचे अश्वासन दिले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे यांच्यासह सहकाऱयांचा पोलिस बंदोबस्त चोख होता. रास्ता रोकोमुळे सुमारे तासभर वाहतुक बंद पडली होती. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या व धेय्य धोरणांविरुध्द रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या. यानिमित्ताने पोलिस ठाण्यात जाऊनही निवेदन दिले.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news republican party road strike in saswad