'स्मार्ट पुणे' अंतर्गत पोलिस स्टेशनमध्येही ‘वाय-फाय’

दिलीप कुऱ्हाडे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

स्मार्ट फोन वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ
 

येरवडा : पुणे महानगरपालिकेने स्मार्ट पुणे अंतर्गत पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांना ‘वाय फाय’ने कनेक्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांसह येथे येणाऱ्यांना मोफत ‘वाय फाय’ सुविधा उपलब्ध झाली आहे. 

पुणे शहरात पहिल्यांदा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील एम.जी. रोडवर (महात्मा गांधी रस्ता) मोफत वाय-फाय सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर जंगली महाराज रस्ता व संभाजी उद्यानात ही मोफत वाय-फाय सुविधा दिली. मात्र त्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर शहरातील सर्वच उद्यानात मोफत ‘वाय-फाय’ची घोषणा महानगरपालिकेने केली होती. मात्र ही घोषणा राहिली होती. तर काही नगरसेवकांनी स्व:खर्चाने आपल्या प्रभागातील उद्यानांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मोफत ‘वाय-फाय’ सुविधा दिली होती. मात्र, पुणे महानरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतर ही सेवा ठप्प झाली.

स्मार्ट पुणे अंतर्गत पुणे महानगरपालिकेने पोलिस आयुक्तालयातील पुणे शहर अंतर्गत असलेल्या सर्वच ठाण्यात ‘वाय-फाय’ सुविधा देण्यात आली आहे. पोलिस ठाण्यातील स्मार्ट फोन वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे कर्मचारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी व्हाॅट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. याबरोबरच पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सुध्दा या सुविधेचा फायदा होत आहे. तर काही नागरिक ऑनलाईन तक्रार देण्यासाठी या सुविधेचा उपयोग करताना दिसत आहे. 
- अशोक कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलिस ठाणे

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news smart pune police stations wifi