कागदपत्रांची तपासणी न करताच बनावट नावे मतदार यादीत

निलेश कांकरिया
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

"अर्ज व कागदपत्रांची कोणताही तपासणी न करताच ही नावे प्रारुप मतदार यादीत समावेश करण्यात आली आहे. त्यातील हजारो मतदार ओळखीचे नाही. त्यांनी जेाडलेली कादगपत्रेही बनावट आहेत. वाघोलीतील बीएलओने भरुन घेतलेल्या नावांचा समावेश त्या यादीत झाला नाही. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच हा प्रकार करण्यात आला आहे. ती सर्व नावे मतदार यादीतून वगळावेत. तसेच या प्रकरणाची सखेाल चौकशी करुन दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व बनावट कागदपत्रे बनविणाऱयांना व बनवून घेणाऱयांना शेाधून त्यांच्यावर कारवाई करावी."
- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परीषद सदस्य.

वाघोली (पुणे) शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघाच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीत पुर्व हवेलीतील विशेषता वाघोलीतील सुमारे 3400 नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. मात्र, हा समावेश करताना मतदारांच्या अर्जाची व त्यांच्या कागदपत्राची तपासणी न करताच ती नावे समावेश करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे या मतदारांच्या अर्जाच्या गठ्ठयासेाबत जेाडण्यात आलेले हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर करण्यात आला आहे. त्याची नोंद हवेली तहसिलदारांकडे नाही. तसेच या मतदारांच्या अर्जासोबत जोडलेले अनेक कागदपत्रे बनावट बनविण्यात आली आहेत. माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रामदास दाभाडे यांनी हा प्रकार उजेडात आणला. दरम्यान, या प्रकाराबाबत आमदार बाबुराव पाचर्णे व दाभाडे यानी मुख्य निवडणुक आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.

एक ते 31 जुलै दरम्यान तरुण व पात्र प्रथम मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मेाहीम राबविण्यात आली. या यासाठी वाघोलीत सुमारे 20 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली हेाती. त्यानी नवीन मतदारांचे अर्ज भरुन घेतले. हे अर्ज त्यानी वाघोली तलाठी यांच्याकडे सुपुर्द केले. मात्र, प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये पुर्व हवेलीतील विशेषता वाघोलीतील सुमारे 3400 नवीन नावांचा समावेश झाल्याचे दिसून आले. परंतु, बीएलओ यांनी भरुन घेतलेल्या मतदारांचे नाव त्या यादीत आले नाही. जी नावे यादीत समाविष्ट झाली. त्यातील हजारो मतदार ओळखीचे नसल्याने रामदास दाभाडे यानी त्याची सविस्तर माहीती घेतली.

वाघोलीचे तलाठी यानी मतदारांचे अर्ज व त्यासेाबतचे पत्र हवेली तहसिल कार्यालयाकडे न पाठवता तलाठी कार्यालयाच्या एका व्यक्तीकडून परस्पर शिरुर तहसिल कार्यालयाकडे पाठविले. ते अर्ज तेथील कार्यालयात ठेवून तो व्यक्ती निघून गेला. शिरुर तहसिल कार्यालयातील एक महिला कर्मचार्याने त्या पत्रावर, "प्राप्त अर्जामध्ये काही यादी भागावर गुलाबी प्रती जेाडलेल्या नाहीत. अर्ज मंजूर / नामंजूर स्पष्ट उल्लेख केलेला नाही. सदर अर्ज फक्त कार्यालयामध्ये आणून दिलेले आहेत. अर्ज जमा करुन कोणत्याही प्रकारची पोहच जमा करणाऱयांनी घेतलेली नाही." असा शेरा मारला.

मात्र, यानंतरही त्या अर्जाची तपासणी न करताच त्या सर्व नावांचा समावेश प्रारुप मतदार यादीत करण्यात आला. हा प्रकार अधिकच संशयित वाटल्याने दाभाडे यानी हवेली तहसिल कार्यालयात चैाकशी केली असता त्यांच्याकडे वाघोलीतून एकही मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाला नसल्याचे समजले. तसेच तहसिलदारांच्या पत्राचा तलाठी यांनी परस्पर वापर करण्यात आल्याचे समजले. यानंतर त्यानी त्या अर्जासेाबत जोडलेल्या काही कागदपत्रांची तपासणी केली असता त्यातील अनेक कागदपत्रे बनावट असल्याचेही समेार आले आहे.

अशा प्रकारे बनावटपणा
1) मतदार नोंदणी अर्जाच्या गठ्ठयासेाबत जोडलेल्या हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर. ते पत्रही बनावट असल्याचा संशय.
2) अर्जासेाबत जेाडलेल्या अनेक प्रॅापर्टीच्या इनडेक्स - 2 (सुची क्रमांक 2) ची एकाच दिवसात नोंदणी. त्यावर सारखाच दस्त क्रमांक.
3) अनेक मतदारांचे सेासायटी, इमारत व प्लॅट नंबर एकच.
4) प्रॅापर्टी इनडेक्स - 2 वर केवळ प्लॅट नंबर व मालकाचे नाव बदललेले. बदललेल्या नावाचा फाँट अन्य सर्व फाँट पेक्षा वेगळा.
5) जी प्रॅापर्टीची इनडेक्स प्रत जेाडण्यात आली आहे. त्या प्लॅटचे मूळ मालक वेगळेच.
6) महावितरणचे बिल बनावट. बिलावर ग्राहकाचे नाव व पत्ता बदलण्यात आला आहे. मुळ बिल दुसऱयाच ग्राहकाच्या नावावर.
5) बहुतांश आधार कार्ड पुणे वगळता अन्य जिल्हयातील
6) अर्जावर अर्ज मंजूर-नामंजूर असा कोणताही शिरुर निवडणूक नायब तहसिलदारांचा शेरा व स्वाक्षरी नाही.

"एक जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान वाघोलीत नवीन नोंदणी झालेल्या मतदारांचा एकही अर्ज वाघोली तलाठी कार्यालयाकडून हवेली तहसिल कार्यालयाला प्राप्त झाला नाही. ते अर्ज परस्पर शिरुर कार्यालयाकडे गेल्याचे समजते. दाभाडे यानी तक्रार केल्यानंतर नावे प्रारुप यादीत समाविष्ट झाल्याचे कळाले. याबाबत सविस्तर माहीती घेत आहे."
- डॅा सुनिल शेळके, निवासी नायब तहसिलदार, हवेली.

"नवीन मतदारांच्या अर्जासेाबत जेाडलेले हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर केल्याचे दिसून येते. आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. वाघोली वगळता अऩ्य गावातील सर्व अर्जाची व पत्राची नोंद आमच्याकडे आहे."
- सुनिल भगत, निवडणूक नायब तहसिलदार, हवेली

"वाघोलीतील अर्जाची तपासणी करुन व त्यावर मंजूर-नामंजूर शेरा मारणे ही हवेली तहसिल कार्यालयाची जबाबदारी आहे. त्यानंतर मंजूर नावे यादीत समाविष्ट करण्याची आमची जबाबदारी आहे. आमच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाला हवेली तहसिलदारांचे पत्र जोडलेले होते. यासंदर्भात तक्रार मिळाली असून त्याची सविस्तर माहिती घेत आहे.
- रणजित भेासले, तहसिलदार, शिरुर.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news wagholi bogus names in voters list