पुणेकरांना हवाय आता घरातच ऑक्सिजन!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

वडिलांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना सिलिंडरद्वारे ऑक्‍सिजन द्यावा लागतो. गेल्या महिनाभरापासून शहरात वणवण करूनही ऑक्‍सिजनचा सिलिंडर मिळत नाही. त्यांचा प्राण अक्षरशः कंठाशी आला. शेवटी या सिलिंडरचा नाद सोडला आणि ‘ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन’ घेतले... सागर कुलकर्णी बोलत होते.

पुणे - वडिलांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना सिलिंडरद्वारे ऑक्‍सिजन द्यावा लागतो. गेल्या महिनाभरापासून शहरात वणवण करूनही ऑक्‍सिजनचा सिलिंडर मिळत नाही. त्यांचा प्राण अक्षरशः कंठाशी आला. शेवटी या सिलिंडरचा नाद सोडला आणि ‘ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन’ घेतले... सागर कुलकर्णी बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेतील प्राणवायू शोषून घेणाऱ्या ‘ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन’ची मागणी शहरात दहा पटींनी वाढली आहे. ऑक्‍सिजन सिलिंडर सहजा-सहजी मिळत नसल्याने श्‍वसन आणि फुफ्फुस विकारांच्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी या मशिनशिवाय पर्याय रहिला नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. 

'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यांना उपचारासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजनवर ठेवावे लागते. रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणात ऑक्‍सिजनची मागणी वाढली. पुणे जिल्ह्यासह शहरात उत्पादित होणारा ऑक्‍सिजन आणि मागणी यात तफावत निर्माण झाली. शहरांमधील उपनगर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांना वेळेत पुरेसा ऑक्‍सिजन मिळण्यात अडथळे येत आहेत. ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान कोरोना झाल्याचे निदान झालेल्या काही रुग्णांनी ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याने घरी ऑक्‍सिजन सिलिंडर घेऊन ठेवल्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे रुग्णालयांना पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा होईल, अशी व्यवस्था उभारण्यात आली. मात्र, त्यामुळे घरात उपचार घेणाऱ्या श्‍वसनाच्या आणि फुफ्फुस विकाराच्या रुग्णांना ऑक्‍सिजन सिलिंडर मिळण्यात अडथळे आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘ऑक्‍सिजन कॉन्सट्रेडेट मशिन’चा पर्याय पुढे येत आहे. 

पीएमपी प्रवाशांना आता मासिक पासमुळे मिळणार दिलासा ! 

सागर कुलकर्णी म्हणाले की  सुरूवातीला दीड हजार रुपयांमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडर भरून मिळत होता. त्याची किंमत तीन हजारांवर गेली. याचा खर्च आवाक्‍याबाहेर तर गेलाच, पण त्यापेक्षा ऑक्‍सिजन मिळतच नाही, हा त्रास जास्त होऊ लागला. त्यामुळे शेवटी मशिन घेण्याचा निर्णय घेतला. 

‘पारेख डिस्ट्रिब्युटर’चे संदीप पारेख म्हणाले की, शहर आणि परिसरात या मशिनच्या खरेदीचा कल वाढला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे दहा पटीने या मशिनची खरेदी वाढली आहे. 

पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या गतीला कोरोना आणि लॉकडाउनचा बसला फटका

आँक्‍सिजन वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी म्हणाले की, वर्षानुवर्षे आमच्याकडून ऑक्‍सिजन सिलिंडर घेऊन जाणारे ग्राहक आहेत. त्यांना प्राणवायूचा पुरवठा करणे सध्यस्थितीत अशक्‍य झाले आहे. त्यामुळे या मशिनचा पर्याय आता पुढे ठेवला आहे.

बापरे! पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडे आहेत फक्त ७ डॉक्‍टर!

ऑक्‍सिजन सिलिंडरची मागणी वेगाने वाढत असताना हे मशिन त्याला पर्याय म्हणून पुढे येत आहे. सतत ऑक्‍सिजनसाठी सिलिंडर वापरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनी या मशिनला प्राधान्य दिले असल्याचे दिसते, असे निरीक्षण औषध व्यापारी प्रसन्न पाटील यांनी नोंदविले.

असा मिळतो शरीराला प्राणवायू 

  • एका श्‍वासातून अर्धा लिटर हवा आत जाते 
  • दिवसभरात 10 हजार लिटर हवा आपल्या फुफ्फुसात जाते 
  • दहा हजार लिटर हवेतून 2100 लिटर प्राणवायू मिळतो 
  • त्यापैकी 1000 लिटर आपण शोषून घेतो 
  • Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune residents want oxygen at home now