पुणे : ७० रुग्णांची प्रकृती गंभीर; कोरोनामुक्तांच्या संख्येचाच तेवढा पुणेकरांना दिलासा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

शहरातील काही पेठा आणि उपनगरांतील काही परिसरांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

पुणे : पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या फारशी काही कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी (ता.३०) दिवसभरात ८६ नवे रुग्ण सापडले असून, आणखी एक चिंता म्हणजे ७० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ८५ जणांचा जीव गेला आहे. सध्या विविध रुग्णालयांत १ हजार १५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणेकरांसाठी दिलासा आहे; तो कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येचा; आतापर्यंत २७४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

- पुण्यात कोरोनाच्या विर्सजनाचा 'श्रीगणेशा'; काय घडलं वाचा!

शहरातील काही पेठा आणि उपनगरांतील काही परिसरांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात गुरुवारी पुन्हा ८६ रुग्णांची भर पडली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत रोज साधारपणे ८० ते १०० रुग्ण आढळून येत आहेत.

शहरातील आतापर्यंत ९ हजार १९८ जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमन्यांची तपासणी करण्यात अली आहे. त्यापैकी ७६८९ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १ हजार ५१८ कोरोनाबाधितांपैकी ८१ जण मरण पावले असून, २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Big Breaking : बारामती झाली कोरोनामुक्त; अखेरचा पेशंट घरी परतला!

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असतानाच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी विविध भागांत जाऊन विलगीकरण कक्ष, त्यासाठी नव्या जागा आणि संभाव्य उपायांचा आढावा घेतला. तेव्हा, काही भागांत लोकांची गर्दी दिसून आल्याने अग्रवाल यांनी नागरिकांना खडसावले. काही जणांच्या चुकांमुळे इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे सांगतानाच गर्दी न करण्याचे आवाहनही अग्रवाल यांनी केले.

- केंद्राचे पथक म्हणते, बारामतीचे हे काम देशभरात व्हावे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune there are 70 corona patients are in critical condition