'एमएचटी-सीईटी' मध्ये पुणे अव्वल 

MHT-CET-Exam
MHT-CET-Exam

पीसीएम व पीसीबी ग्रुपमध्ये पुण्याचे विद्यार्थी प्रथम 
पुणे - इंजिनिअरींग, फार्मसी आणि कृषी पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल सीईटी सेलने शनिवारी उशीरा जाहीर केला. यामध्ये पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमध्ये पुण्यातील विद्यार्थी अव्वल आले आहेत. पीसीएम ग्रुपमध्ये सानिका गुमास्ते ही राज्यात पहिली आणि सौरभ जोग हा दुसरा आला आहे. तर पीसीबी ग्रुपमध्ये अनिश जगदाळे याने पहिला क्रमांक पटकावला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना'मुळे 'एमएचटी-सीईटी' ही परीक्षा आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आली. त्यानंतर एका महिन्याने निकाल जाहीर केला. या परीक्षेसाठी राज्यभरातून ५ लाख ४२ हजार ४३१ जणांनी नोंदणी केंली होती. त्यापैकी ३ लाख ८६ हजार ६०४ जणांनी परीक्षा दिली. परीक्षेला उपस्थित राहण्याचे प्रमाण ७१.२७ टक्के इतके होते. तर कोरोना'मुळे व परीक्षा उशीरा झाल्याने या सीईटीला १ लाख ५५ हजार ८२७ म्हणजेच २८.७३ टक्के गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. ही परीक्षा राज्यात ३६ जिल्ह्यात १८७ केंद्रांवर तर महाराष्ट्राबाहेर १० ठिकाणी घेण्यात आली होती. 

पीसीएम ग्रुपसाठी १ लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थी बसले होते. त्यामधून २२ जणांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. त्यामध्ये पुण्याची सानिका गुमास्ते पहिली तर सचिन जोग दुसरा आला आहे. तर उर्वरित २० जणांमध्ये ८ जण मुंबई उपनगरांमधील विद्यार्थी आहेत. तर कोल्हापूर ३ , सोलापूर २ आणी नागपूर, ठाणे, वर्धा, नगर, यवतमाळ, रायगड, धुळे येथील प्रत्येकी एका विद्यार्थी अशा २२ जणांचा समावेश आहे.

पीसीबी ग्रुपमध्ये २ लाख ११ हजार ९२५ जण बसले होते. त्यापैकी १९ जणांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. या यादीत पुण्याचा एकमेव विद्यार्थी असलेला अनिश जगदाळे याने पहिला क्रमांक मिळवला. नागपूर व लातूरचे प्रत्येकी तीन, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी दोघे या यादीत आहेत. तर पालघर, नांदेड, सांगली, चंद्रपूर येथील प्रत्येकी एक विद्यार्थी या यादीत चमकला आहे. 

विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर त्याचे स्कोअरकार्ड उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com