पुण्यात घर घेताय? वाचा महापालिकेनं काय आवाहन केलय ते

Home
Home

पुणे - बेकायदा उभारलेल्या इमारतींच्या बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्याने त्या कोसळण्याची शक्‍यता महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. अपुऱ्या जागेतील बांधकाम, त्यावर मजल्यांचा थर, बांधणीच्या साहित्यातील मिश्रणांमुळे ही बांधकामे धोकादायक असून, त्यामुळे रहिवाशांच्या जिवाला धोकाही होण्याची भीती आहे. परिणामी, ही बांधकामे प्राधान्याने पाडण्यात येत असून, बांधकाम परवानगीची खातरजमा केल्याशिवाय घरे घेऊ नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात प्रामुख्याने उपनगरांत बेकायदा बांधकामे झाली आहेत. लॉकडाउनच्या काळात महापालिकेची नजर चुकवून, ही बांधकामे आटोपण्यात आली आहेत. ती करताना दर्जाही राखला गेला नसल्याचे महापालिकेच्या बांधकाम खात्याने केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी  रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांना गती देतानाच बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार उपनगरांतील मुंढवा, लोहगाव, वडगाव, वारजे परिसरातील लाखो चौरस फुटांची बांधकामे पाडण्यात आली आहेत. मात्र, या इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे काणाडोळा करूनच इमारती उभारल्या गेल्याचे दिसून आले आहे.

राजकीय हस्तक्षेप
बेकायदा बांधकामे पाडून ती पुन्हा उभारली जाणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेच्या बांधकाम खात्याने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यात रोजच वेगवेगळ्या भागांतील इमारती जमीनदोस्त करण्यात येत आहेत. परंतु, काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपही होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, लोकांच्या सुरक्षिततेसह शहर विकासाचा विचार करून, अशा बांधकामांवर कारवाई होईल, असे महापालिकेच्या बांधकाम खात्यातील अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी स्पष्ट केले.

बेकायदा इमारती उभारल्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्यावर कोणताही खुलासा न झाल्याने त्या पाडण्यात येत आहेत. पाडलेल्या इमारती पुन्हा बांधता येणार नाहीत अशा पद्धतीने, म्हणजे संपूर्ण इमारत पूर्णपणे पाडली जात आहे. या पुढच्या काळात अशी बांधकामे होणार नाहीत. 
- रोहिदास गव्हाणे, वरिष्ठ कार्यकारी अभियंता, महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com