राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी वेळेचे बंधन नाही

ulhas-bapat.jpg
ulhas-bapat.jpg

महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना या पक्षाला कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना विरोध पक्ष म्हणून संधी दिली. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला. यामुळे शिवसेना आणि अन्य दोन पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते.

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा 

आज सकाळी अचानक राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली. राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. दिवसभरातल्या कोणत्याही प्रहरात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. पंतप्रधांनी राष्ट्रपतींना शिफारस केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती राजवट उठवावीच लागते. त्यानुसार घडले आणि राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावले, त्यांचा शपथविधी देखील झाला.

आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय?  

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. आता प्रश्‍न हा आहे की अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत. त्यांना भाजपबरोबर जायचे असेल, तर पक्षातून 36 आमदार घेऊन बाहेर पडावे लागेल. अन्यथा, पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. मग त्यांची आमदारकी रद्द होईल. पण पुढील पंधरा दिवसांत त्या पक्षाने आमदारांना माफ केले, तर ते अपात्र ठरणार नाहीत. दोन तृतीयांश सदस्य राष्ट्रवादीतून बाहेर पडले, तर ते अपात्र होत नाही. परंतु विधानसभेत त्यांनी पक्षाच्या आदेशच्या विरोधात मतदान केले आणि पक्षाने त्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली, तर हे सदस्य अपात्र ठरतील. अशा स्थितीत कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध करता येणार नाही. म्हणून पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि महाराष्ट्राला पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री 

सध्याची स्थिती पाहता, कोणताही पक्ष हा विचारसरणीला अनुसरून राजकारण करीत नाही. विचारधारेला त्यांनी तिलांजली दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील जनता मात्र भरडली जात आहे.

पुण्यातील नगरसेवकांचे अजित पवारांना बळ?

(लेखक राज्यघटना तज्ज्ञ आहे.)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com